या अभिनेत्रींच्या लेकीसुद्धा काही कमी नाहीत,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 09:38 AM2017-07-18T09:38:01+5:302017-07-18T15:08:01+5:30

आपलं सौंदर्य, स्टायलिश तितक्याच मादक अदा आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. लग्नानंतर या अभिनेत्री अभिनयापासून ...

These actresses are not very few, read detailed | या अभिनेत्रींच्या लेकीसुद्धा काही कमी नाहीत,वाचा सविस्तर

या अभिनेत्रींच्या लेकीसुद्धा काही कमी नाहीत,वाचा सविस्तर

googlenewsNext
ong>आपलं सौंदर्य, स्टायलिश तितक्याच मादक अदा आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. लग्नानंतर या अभिनेत्री अभिनयापासून दूर गेल्या असल्या तरी रसिकांच्या मनात या अभिनेत्रींविषयी प्रेम हे कायम असतं. कालांतराने त्या सिनेमा, मालिकांपासून दूर जातात. या अभिनेत्री रसिकांपासून दूर गेल्या असल्या तरी त्यांच्या मुलांमुळे त्या पुन्हा चर्चेत येतात. विशेषतः या अभिनेत्रींच्या मुली असतील तर त्यांची रसिकांमध्ये थोडी जास्तच चर्चा असते. या अभिनेत्रींच्या मुलींविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. एक काळ आपल्या अभिनयानं रसिकांवर जादू केलेल्या काही अभिनेत्रींच्या मुली सध्या त्यांच्या ग्लॅमरस लूक आणि अदांमुळे चर्चेत आहेत. आपल्या आईपेक्षाही मादक आणि स्टायलिश दिसणा-या या अभिनेत्रींच्या लेकी आहेत कोण ते जाणून घेऊया.
 
पूजा बेदी-आलिया बेदी  



बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये 2012 साली अभिनेत्री पूजा बेदीचं रसिकांना दर्शन झालं होतं. आपला अभिनय आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असणारी पूजा बेदी सध्या सिनेमा आणि टीव्ही मालिकांपासून दूर आहे. पूजा प्रसिद्धीपासून दूर असली तरी पूजाची लेक आलिया चर्चेत आहे. याला कारण आहे आलियाचा स्टायलिश अंदाज. आलिया सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर कायम आपले बोल्ड, बिकीनी फोटो आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या 3 लाखांहून अधिक आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारी आलिया फॅशन जगतात स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत असून लवकरच ती बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवणार असल्याचे समजतंय.
 
पूनम ढिल्लो-पलोमा  



विविध हिंदी सिनेमांमधून अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बिग बॉसच्या तिस-या सीझनमध्ये 2009 साली त्या छोट्या पडद्यावर झळकल्या होत्या. पूनम ढिल्लो यांची लेक पमोला ही सुद्धा त्यांच्याप्रमाणेच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर पमोला बरीच एक्टिव्ह असते. स्वतःचे स्टायलिश फोटो, सुट्टीच्या धम्माल मस्तीचे फोटो पमोला सोशल मीडियावर शेअर करते.
 
दीपशिखा नागपाल- विधिका



 छोट्या पडद्यावरील बालवीर आणि बिग बॉसच्या आठव्या सीझनची स्पर्धक असलेल्या दीपशिखा नागपाल हिची लेक विधिकासुद्धा ग्लॅमरस आहे. काही दिवसांपूवी विधिकानं स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यांत विधिकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.
 
भाग्यश्री – अवंतिका दासानी




मैंने प्यार किया म्हणत अभिनेत्री भाग्यश्रीनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. यानंतर भाग्यश्रीला सिनेमात फारसं यश मिळालं नसलं तरी तिनं छोट्या पडद्यावर आपली नवी इनिंग सुरु केली. छोट्या पडद्यावर विविध मालिकांमध्ये भाग्यश्रीच्या अभिनयाची जादू रसिकांनी अनुभवली. सध्या भाग्यश्री प्रसिद्धीपासून दूर राहत असली तरी तिची लेक अवंतिका सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. अवंतिकाचं इन्स्टाग्राम अकाऊंटच्या तिच्या स्टायलिश, ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे.
 
श्वेता तिवारी – पलक  




कसोटी जिंदगी की या मालिकेमधून अभिनेत्री श्वेता तिवारीला नवी ओळख मिळाली. तिचा ग्लॅमरस अंदाज रसिकांनी पाहिला आहे. तिच्याप्रमाणे तिची लेकही तितकीच ग्लॅमरस आहे. त्यामुळेच की पलक लवकरच सिनेमात एंट्री करणार आहे. क्विकी या सिनेमातून पलक अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. तारें जमी पर फेम अभिनेता दर्शिल सफारीसह पलक आपल्या अभिनयाची इनिंग सुरु करणार आहे.
 
जरीना वहाब- सना



यहाँ मैं घर घर खेली खेली या मालिकेमधून अभिनेत्री जरीना वहाबनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली.जरीना यांच्याप्रमाणेच त्यांची लेक सनासुद्धा त्यांच्या इतकीच स्टायलिश आहे. सना म्हणजे जरीना आणि आदित्य पांचोली यांची लेक आहे.लॉस एंजिलिसमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या सनाला अभिनयात फारसा रस नाही. 2007 साली सनाला शाकालाका बुम बुम हा सिनेमा ऑफर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी सनानं एक्सपोझ करण्यास नकार दिल्यानं हा सिनेमा कंगणा राणौतच्या वाट्याला गेला. यानंतर विविध सिनेमांसाठी सनाला विचारणा झाली,मात्र त्यास तिने नकार दिला. काही वर्षांपूर्वी ड्रग्स स्कँडलमध्ये सनाचं नाव आलं होतं. मुंबईतल्या एका पबमध्ये ड्रगची डील करताना सना आणि शक्ती कपूरचा लेक सिद्धांत याला अटक करण्यात आली होती. 

Web Title: These actresses are not very few, read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.