​‘या’ कलाकारांना मिळाले थेट ‘थिएटर टू बॉलिवूड’चे तिकिट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 15:00 IST2017-06-15T09:30:03+5:302017-06-15T15:00:03+5:30

बॉलिवूडने तुम्हा आम्हाला अनेक प्रतिभावान कलाकार दिले आहेत. कुणी रंगभूमीवरून थेट बॉलिवूडमध्ये आले तर कुणी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत ...

'Theatrical to Bollywood' tickets for 'these' artists !! | ​‘या’ कलाकारांना मिळाले थेट ‘थिएटर टू बॉलिवूड’चे तिकिट!!

​‘या’ कलाकारांना मिळाले थेट ‘थिएटर टू बॉलिवूड’चे तिकिट!!

ong>बॉलिवूडने तुम्हा आम्हाला अनेक प्रतिभावान कलाकार दिले आहेत. कुणी रंगभूमीवरून थेट बॉलिवूडमध्ये आले तर कुणी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत झेप घेतली. खरे तर रंगभूमीच्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये लीड रोल मिळत नाही, असा एक समज आत्ताआत्तापर्यंत होता. पण काळासोबत हा समज खोटा ठरतो आहे. होय, कारण येत्या वर्षांत  अनेक थिएटर आर्टिस्ट बॉलिवूडपटांत लीड रोलमध्ये दिसणार आहेत. अशाच काहींची तोंडओळख...

किर्ती कुल्हारी



किर्ती कुल्हारी ही हाडाची रंगभूमी कलाकार. किर्ती ‘पिंक’मध्ये झळकली. हा तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरमधील टर्निंग पॉर्इंट होता. ‘पिंक’मधील किर्तीची भूमिका तुलनेने फारच लहान होती. पण तरिही ती भाव खावून गेली. कदाचित याचमुळे किर्तीच्या झोळीत दोन मोठे सिनेमे पडलेत. होय, मधूर भांडारकरच्या ‘इंदू सरकार’मध्ये किर्ती लीड रोलमध्ये आहे.  ‘पिंक’मधील किर्तीचा अभिनय पाहून मधूर चांगलाच प्रभावित झाला. इतका की, ‘इंदू सरकार’साठी त्याने कितीर्ला साईन केले. ‘इंदू सरकार’ हा इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीच्या कालखंडातील घटनाक्रमाची पार्श्वभूमी असलेला सिनेमा आहे. चित्रपटाचे नाव ‘इंदू सरकार’ असले तरी  इंदिरा गांधींशी त्याचा संबंध नाही. याशिवाय अभिनव देवच्या आगामी चित्रपटात ती इमरान खानसोबत दिसणार आहे.

रसिका दुगल



रसिकाला आपण कायम साध्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. पण तिच्या या सर्वच भूमिका सामान्य माणसाच्या मनाला स्पर्शून जाणाºया आहेत. रसिका ही सुद्धा थिएटर आर्टिस्ट. थिएटर आर्टिस्ट असल्याने भूमिकेची लांबी किती, याकडे रसिका अजिबात लक्ष देत नाही. वाट्याला येईल ती भूमिका पडद्यावर जिवंत करणे, हेच तिचे लक्ष्य. रसिका लवकरच नंदिता दासच्या ‘मन्टो’ या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. यात ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट दिसणार आहे.

जिम सरभ



‘नीरजा’मध्ये जिम सरभ निगेटीव्ह रोलमध्ये दिसला. पण भूमिका निगेटीव्ह असूनही जिमने त्यात जीव ओतला. कदाचित त्याचेच फळ म्हणून त्याला ‘राबता’ मिळाला. सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अलीकडे रिलीज झालेल्या या चित्रपटात जिम महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. लवकरच तो संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. याशिवाय संजय दत्तच्या बायोपिकमध्येही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

सयानी गुप्ता



भूमिका कुठलीही असो सयानी गुप्ता त्यात गढून जाते. थिएटर आर्टिस्ट असलेल्या सयानीला आपण ‘मार्गारेट विद अ स्ट्रॉ’,‘जॉली एलएलबी2’ अशा अनेक चित्रपटात पाहिले आहे. लवकरच ती ‘दी हंग्री’ या चित्रपटात लीड फिमेल रोल साकारताना दिसणार आहे. यात ती नसीरूद्दीन शहा यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

मानव कौल



मानवने थिएटरमधून आपल्या अ‍ॅक्टींग करिअरला सुरुवात केली होती. अनेक नाटकाचे दिग्दर्शनही त्याने केले. रंगभूमीवरचा एक कसलेला स्टार अशी ओळख मिळवणाºया मानवकडे अचानक बॉलिवूडची संधी चालून आली. लवकरच तो विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुम्हारी सुलूू’ या चित्रपटात दिसणार आहे. तेही विद्याच्या अपोझिट.

Web Title: 'Theatrical to Bollywood' tickets for 'these' artists !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.