The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्समुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार ॲक्शनचा डबल धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:27 PM2023-09-30T17:27:14+5:302023-09-30T17:27:37+5:30

The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्स हे दोन्ही चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

The Marvels-Tiger 3: Tiger 3 and The Marvels will give audiences a double blast of action this Diwali. | The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्समुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार ॲक्शनचा डबल धमाका

The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्समुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार ॲक्शनचा डबल धमाका

googlenewsNext

यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने धमाकेदार होणार आहे यंदाच्या दिवाळीत दोन बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर ३ (Tiger 3) आणि द मार्व्हल्स (The Marvels) प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. यामुळे यंदाची दिवाळी ॲक्शन आणि थरारपट सिनेप्रेमींसाठी कायम लक्षात राहील अशी ठरणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी टायगर ३ मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तर द मार्व्हल्समध्ये सुपर हीरो धमाल उडवणार आहे. या दोन चित्रपटांमुळे सिनेप्रेमींसाठी यंदाची दिवाळी ही डबल बोनान्झा असेल.

टायगर ३ हा चित्रपट टायगर चित्रपट मालिकेतील तिसरा चित्रपट आहे. ठराविक ॲक्शन दृश्य आणि जबरदस्त कथानक असलेल्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये रॉ एजंट असलेला सलमान खानची या चित्रपटातील झलक दाखवण्यात आली आहे. 

दोन दमदार सिनेमा येणार आमने-सामने

दुसरीकडे मार्व्हल्स सिने विश्वातील पुढील चित्रपट द मार्व्हल्स हा देखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सुपर हिरोंची थरारक कामगिरी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे या दोन जबरदस्त चित्रपटांचा यंदाच्या दिवाळीत मुकाबला होणार आहे यामुळे यंदाची दिवाळी आणखीनच बहारदार होणार असून मनोरंजनाची ही आतिषबाजी सिने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरेल यात शंकाच नाही.

Web Title: The Marvels-Tiger 3: Tiger 3 and The Marvels will give audiences a double blast of action this Diwali.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ