रणबीर कपूरने चोरले होते नीतू कपूर यांचे दागिने, पण नेमकं काय होतं कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:32 AM2024-03-27T11:32:42+5:302024-03-27T11:44:35+5:30

'द ग्रेट इंडियन कपिल शो' येत्या ३० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The Great Indian Kapil Show: Ranbir Kapoor Says He Gifted Neetu Kapoor's Jewellery To Ex-Girlfriends | रणबीर कपूरने चोरले होते नीतू कपूर यांचे दागिने, पण नेमकं काय होतं कारण ?

रणबीर कपूरने चोरले होते नीतू कपूर यांचे दागिने, पण नेमकं काय होतं कारण ?

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणबीर कायमच त्यांच्या खाजगी आयुष्यावर भाष्य करणं टाळतो. पण नुकेतच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये त्याने एक मजेशीर किस्सा सांगितला. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' येत्या ३० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिल्या एपिसोडमध्ये  रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर सहभागी झाले. याचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये कपिल शर्मा याने रणबीरच्या जुन्या गोष्टीची आठवण करून देत म्हटलं, 'तुम्हाला माहिती आहे का की  रणबीर कपूर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी बहीण रिद्धिमा कपूरचे कपडे चोरून तिला द्यायचा'. यावर कपिल शर्माच्या कमेंटला उत्तर देताना रणबीर कपूर म्हणाला, ' बहिणीचे कपडेच नाही तर मी आईचे दागिनेही चोरून गर्लफ्रेंडला द्यायचो'. यावर एकच हशा पिकला. 

रणबीर, नितू आणि रिद्धिमा कपूर यांनी या एपिसोडमध्ये जोरदार मजा-मस्ती केली. यावेळी त्यांनी आलियाची लेक राहाच्या काही खास गोष्टी सांगिलत्या.  'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिला एपिसोड हा 30 मार्चपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होणार आहे.  यामध्ये सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, अर्चना पूरण सिंग आणि किकू शारदा यांच्या नावांचा समावेश आहे. 
 

Web Title: The Great Indian Kapil Show: Ranbir Kapoor Says He Gifted Neetu Kapoor's Jewellery To Ex-Girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.