आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:28 IST2025-08-21T15:26:40+5:302025-08-21T15:28:54+5:30

Bads Of Bollywood : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची पहिली वेबसीरिज बॅड्स ऑफ बॉलिवूडचा प्रीव्ह्यू लाँच नुकताच पार पडला. सध्या या सीरिजची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान या वेबसीरिजमधून २००० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायकाचं पुनरागमन होणार आहे.

the bads of bollywood rajat bedi fans celebrate comeback of b towns og villain | आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा मुलगा आर्यन खान(Aryan Khan)ची पहिली वेबसीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ( Bads Of Bollywood )चा प्रीव्ह्यू लाँच नुकताच पार पडला. सध्या या सीरिजची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान या वेबसीरिजमधून २००० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायकाचं पुनरागमन होणार आहे. अभिनेत्याचा पहिला लूक समोर येताच चाहते त्याला पाहून खूप आनंदी झाले. हा अभिनेता म्हणजे जानी दुश्मन आणि कोई मिल गयामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा रजत बेदी (Rajat Bedi).  

आर्यन खान सध्या त्याच्या पहिल्या वेबसीरिज बॅड्स ऑफ बॉलिवूडमुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या वेबसीरिजमध्ये बी-टाउनमधील अनेक मोठे स्टार कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत. या वेबसीरिजद्वारे एक कलाकार देखील बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे, ज्याच्या पहिल्या लूकनेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा अभिनेता रजत बेदी आहे ज्याने जानी दुश्मन आणि कोई मिल गया या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली होती.


रजत बेदी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहे. २००० च्या दशकात त्याने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. अनेक वर्षांनंतर तो एका मोठ्या बॅनरखाली बनवलेल्या प्रोजेक्टद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहेत. तो शेवटचा पार्टनर सिनेमात दिसला होता. त्यानंतर, तो काही चित्रपटांमध्ये दिसला पण त्याला पूर्वीसारखे हवे तसे यश मिळाले नाही.

 

रजत बेदीच्या कमबॅकमुळे लोक झाले खूश
आता तो १७ वर्षांनी आर्यन खानच्या वेब सीरिज बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून पुनरागमन करणार आहे. मालिकेच्या प्रिव्ह्यूमधून अभिनेत्याचा पहिला लूक देखील समोर आला आहे, जो पाहून लोक खूप आनंदी आहेत. एका युजरने म्हटले, "२२ वर्षे झाली, पण ही व्यक्ती तशीच दिसते. धन्यवाद आर्यन खान." दुसऱ्याने म्हटले, "शाब्बास आर्यन खान." आणखी एकाने लिहिले, "रजत बेदी परत आला आहे. आर्यनने भावाचा आदर राखला आहे." दुसऱ्याने म्हटले, "रजत बेदी परत आला आहे."

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल

बॅड्स ऑफ बॉलिवूड ही सीरिज यावर्षी १८ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात शाहरुख खान, बॉबी देओल, सलमान खान, लक्ष्य, रणवीर सिंग, मनोज पाहवा, मोना सिंग, राघव जुयाल आणि गौतमी कपूरसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत.

Web Title: the bads of bollywood rajat bedi fans celebrate comeback of b towns og villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.