'द आर्चीज' नंतर खुशी कपूरला लागली लॉटरी, करण जोहरच्या चित्रपटात झाली अभिनेत्रीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:54 PM2023-12-12T17:54:18+5:302023-12-12T17:56:02+5:30

खुशी कपूरने अलीकडेच 'द आर्चिज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

The archies actress khushi kapoor gets,karan johar film will share screen with ibrahim ali khan | 'द आर्चीज' नंतर खुशी कपूरला लागली लॉटरी, करण जोहरच्या चित्रपटात झाली अभिनेत्रीची एंट्री

'द आर्चीज' नंतर खुशी कपूरला लागली लॉटरी, करण जोहरच्या चित्रपटात झाली अभिनेत्रीची एंट्री

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने अलीकडेच 'द आर्चिज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. खुशीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या सगळ्या दरम्यान, खुशीच्या हातात आणखी एक मोठा चित्रपट आला आहे आणि ती या चित्रपटात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, इब्राहिम अली खान आणि खुशी यांनी एकत्र एक चित्रपट साइन केला आहे आणि या प्रोजेक्टचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहिती आहे. हा चित्रपट थेट डिजिटलवर प्रदर्शित होणार असल्याचेही बोलले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार असून त्याचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या शौना गौतमने काही मोठ्या बॅनरच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये एडी म्हणून काम केले आहे. 

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आधीच त्याच्या डेब्यू प्रोजेक्टवर काम करत आहे. इब्राहिम काजोलसोबत एका चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाचे डिटेल्स सध्या सीक्रेट ठेवण्यात आले आहेत.

Web Title: The archies actress khushi kapoor gets,karan johar film will share screen with ibrahim ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.