संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 15:23 IST2023-09-05T15:23:22+5:302023-09-05T15:23:56+5:30
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत येत असतो.

संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत येत असतो. मग त्याचं अफेयर असो किंवा लग्न. प्रत्येक वेळा संजय दत्त चर्चेत असतो. संजय दत्तचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत झाले होते. ऋचा आणि संजय यांची लेक त्रिशाला दत्त आहे. त्रिशाला तिच्या आजी-आजोबांसोबत युएसमध्ये राहते. संजयने ऋचानंतर रिया पिल्लईसोबत लग्न केले होते आणि तिच्यासोबत वेगळे झाल्यानंतर मान्यता दत्तसोबत तिसऱ्यांदा संसार थाटला. त्रिशाला भारतात फार कमी वेळा येते. तिच्यात आणि तिची सावत्र आई मान्यताच्या वयात किती अंतर आहे, हे आपण जाणून घेऊयात.
मान्यता दत्त आणि त्रिशाला यांच्या वयात फक्त १० वर्षांचं अंतर आहे. त्रिशाला तिच्या आई म्हणजेच मान्यता पेक्षा वयाने फक्त १० वर्षे लहान आहे. मान्यताचा जन्म २२ जुलै, १९७८मध्ये झाला आहे. तर त्रिशाला जन्म १९८८ साली झाला आहे. संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांचे लग्न १९८७मध्ये झाले होते. १९९६ साली ब्रेन ट्युमरमुळे ऋचा शर्माचे निधन झाले. त्यानंतर त्रिशाला तिच्या आजी आजोबांसोबत युएसमध्ये राहत आहे. तिचे बालपण तिथेच गेले. ती सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
मान्यता बद्दल सांगायचे तर ती जास्त काळ तिच्या कुटुंबासोबत व्यतित करते. संजय दत्त आणि मान्यता यांना जुळे मुले आहेत. इकरा आणि शारान अशी त्यांची नावे आहेत. मान्यतादेखील सोशल मीडियावर सक्रीय असून ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर संजय दत्त शेवटचा रणबीर कपूरसोबत शमशेरा सिनेमात झळकला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरवर आपटला. यातील त्याच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते.