'या' कारणासाठी अक्षय कुमारने मानले अनुपम खेर यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 18:41 IST2016-12-15T17:47:57+5:302016-12-16T18:41:25+5:30
अभिनेता अक्षय कुमार याने अनुपम खेर यांचे आभार मानले आहे. त्याने यासोबत सोशल मीडियावर एक ब्लॉक अॅण्ड व्हाइट फोटो ...
.jpg)
'या' कारणासाठी अक्षय कुमारने मानले अनुपम खेर यांचे आभार
अ िनेता अक्षय कुमार याने अनुपम खेर यांचे आभार मानले आहे. त्याने यासोबत सोशल मीडियावर एक ब्लॉक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोत अक्षय कुमार एका खुर्चीत बसला आहे आणि अनुपम खेर त्याच्या मागे उभे आहेत. या फोटोला अक्षय कुमारने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. एक व्यक्ती ज्या अनेकांना शिकवले आणि माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मला लहान मुलासारखे संभाळले. मी तुमच्यासाठी नेहमीच प्रार्थना करेन. तुमचा मुलगा अक्षय अशी पोस्ट अक्षय कुमार याने केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय आणि अनुपम खेर हे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचे कळतयं.‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ असे त्याचित्रपटाचे नाव आहे. या आधीही अक्षय आणि अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र .‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा त्यांचा 20वा चित्रपटात आहे ज्यात अनुपम खेर आणि अक्षय कुमारसोबत काम करणार आहेत. याआधीही अक्षय कुमारने अनुपम खेर यांचे आभार मानले होते. अनुपम खेर यांनी मागे 14 किलो वजन कमी केले होते त्यावेळी फिट राहण्याची प्रेरणा देण्यासाठी अक्षय कुमारने त्यांचे आभार मानले होते. तसेच 2016 हे वर्ष अक्षयसाठी सर्वांत यशस्वी ठरले आहे. या वर्षी त्याच्या तब्बल तीन चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धमाल केली.