अनुष्काने मानले शाहरूखचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 16:04 IST2016-12-14T16:02:19+5:302016-12-14T16:04:12+5:30

तुम्हाला वाटेल अनुष्काला हे काय झाले? शाहरूखचे आभार ती का मानतेय? पण कारणही तसंच आहे. शाहरूख खान आणि अनुष्का ...

Thank you to be thanked by Serenade | अनुष्काने मानले शाहरूखचे आभार!

अनुष्काने मानले शाहरूखचे आभार!

म्हाला वाटेल अनुष्काला हे काय झाले? शाहरूखचे आभार ती का मानतेय? पण कारणही तसंच आहे. शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटाला आता तब्बल आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीला मिळालेले हिट्स पाहून अनुष्काने सहकलाकार शाहरूख खानचे आभार मानले आहेत. तिने सोशल मीडियावर ‘रब ने...’ चे फोटो शेअर करून दिग्दर्शक आदित्य चोप्रालाही जणू ‘थँक्स’ म्हटले आहे. 

‘रब ने बना दी जोडी‘,‘जब तक हैं जान’ नंतर हे दोघे ‘द रिंग’ या चित्रपटात दिसणार आहेत. चाहत्यांच्या आवडीची ही जोडी पुन्हा एकदा आॅनस्क्रीन पहावयास मिळणार आहे. ‘रब ने..’ च्या जुन्या आठवणींबद्दल बोलताना अनुष्का म्हणते,‘ मला जेव्हा कळाले की, माझ्या डेब्यू चित्रपटात मला काम करावयाचे आहे तेव्हा मला वाटले की, खरंच हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाल दाखवू शकेल का? पण, या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स दिले. आमच्या जोडीलाही एक संधी दिली.’



इम्तियाज अली दिग्दर्शित ‘दि रिंग’ चित्रपटाची शूटिंग सुरू असून, सेटवरील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक ‘दि रिंग’ असे ठेवण्यात आले असून, ११ आॅगस्टला चित्रपट प्रदर्शित होईल, असे कळतेय.

                                      




 

Web Title: Thank you to be thanked by Serenade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.