तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू याचे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 12:22 IST2017-06-26T06:52:43+5:302017-06-26T12:22:43+5:30

तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू याचा एका कार अपघातात मृत्यू झाला. काल रात्री (२५ जून) हा ...

Telugu actor Ravi Teja's brother Bharat Raju passes away | तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू याचे अपघाती निधन

तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू याचे अपघाती निधन

लगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू याचा एका कार अपघातात मृत्यू झाला. काल रात्री (२५ जून) हा अपघात झाला. रात्री १० च्या सुमारास भरत राजू आपल्या स्कॉडा कारमधून जात असताना हैदराबाद बाहेर रस्त्यावर उभ्या एका ट्रकवर त्याची कार आदळली. भरत राजू कारमध्ये एकटा होता. शमशाबाद हॉटेलजवळ उभ्या ट्रकवर भरतच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, भरत राजूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तो ४६ वर्षांचा होता.





भरत राजूने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात ‘धी’, ‘रेडी’,‘आ मुग्गुरू’ व ‘जम्प जिलानी’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. भरत कार चालवताना दारूच्या नशेत होता का, हे अद्याप समोर यायचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक खराब झाला होता. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. पण हा ट्रक कडेला उभा करताना नियमांचे पालन केले गेले नव्हते. याप्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Telugu actor Ravi Teja's brother Bharat Raju passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.