PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:11 PM2021-02-11T12:11:47+5:302021-02-11T12:13:46+5:30

मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि  मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे.

Telangana’s Manasa Varanasi crowned VLCC Femina Miss India World 2020 | PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’

PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’च्या किताबावर नाव कोरणारी मानसा वाराणसी ही  तेलंगणाची आहे.

तेलंगणाची मानसा वाराणसी 2020 ची ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ बनली आहे. ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ चा किताब जिंकणारी मानसा केवळ 23 वर्षांची आहे. हरियाणाची मणिका शोकंद आणि उत्तर प्रदेशची मान्या सिंह यांना पछाडत मानसाने ‘‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020’ ’चा मुकूट आपल्या नावावर केला.
 मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि  मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे.

बुधवारी रात्री मुंबईच्या हयात रिजेंसी हॉटेलमध्ये ‘मिस इंडिया 2020’चा फिनाले रंगला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही स्पर्धा पूर्णपणे डिजिटल रूपात पार पडली.

 अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी या स्पर्धेला लावली होती. अपारशक्ति  कार्यक्रमाचा होस्ट होता तर पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते. तर वाणी स्टार परफॉर्मर होती.

 ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’च्या किताबावर नाव कोरणारी मानसा वाराणसी ही  तेलंगणाची आहे. हैदराबादेत राहणा-या मानसाने याआधी ‘मिस तेलंगणा’ हा किताब जिंकला होता. मानसा ही इंजिनिअर आहे. वसवी कॉलेजातून तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

पेशाने ती फायनान्शिअल एक्सचेंज इन्फॉर्मेशन अ‍ॅनालिस्ट आहे. वाचन, गाणी ऐकणे, डान्स आणि योगा हे तिचे छंद आहेत.  कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणा-या मानसाने 8 वर्षे भरतनाट्यम शिकले आहे. चार वर्षे संगीताचे धडे गिरवले आहेत. खुशी मिश्रा, मान्या सिंह, मानसा, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप ५ फायनलिस्ट होत्या.

Web Title: Telangana’s Manasa Varanasi crowned VLCC Femina Miss India World 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.