होम प्रोडक्शनला टाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:07 IST2016-01-16T01:20:12+5:302016-02-07T14:07:34+5:30

 आता तर रणबीर कपूरनेही अशाच प्रकारचे संकेत दिले आहेत. 'बर्फी'नंतर अनुराग बसूसोबत येणार्‍या रणबीर कपूरच्या 'जग्गा जासूस' चित्रपटाबद्दल सांगितले ...

TATA to home production | होम प्रोडक्शनला टाटा

होम प्रोडक्शनला टाटा

 
ता तर रणबीर कपूरनेही अशाच प्रकारचे संकेत दिले आहेत. 'बर्फी'नंतर अनुराग बसूसोबत येणार्‍या रणबीर कपूरच्या 'जग्गा जासूस' चित्रपटाबद्दल सांगितले जात आहे की, या चित्रपटाचा खरा निर्माता स्वत: रणबीर कपूरच आहे. रणबीरला प्रश्न विचारला गेला होता की, तो त्याचे आजोबा राजकपूर यांच्या आरके बॅनरमध्ये पुन्हा सक्रिय का होत नाही? नेहमीप्रमाणे रणबीरचे उत्तर होते की, सध्या तरी तो असे काही करणार नाही. आपल्या कुटुंबातील बॅनरला सोडून वेगळी निर्मिती कंपनी सुरू करणारा रणबीर कपूर एकटाच कलाकार नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. अनिल कपूरचे वडील सुरेंद्र कपूरने अनेक वर्षे एसके फिल्म्स्मध्ये चित्रपट निर्मिती केली. परंतु तरी देखील अनिल कपूरने आपली स्वतंत्र निर्मिती कंपनी सुरू केली. आमीर खानदेखील या यादीत आहे. त्याचे वडील ताहिर हुसैन यांच्या निर्मिती कंपनीचे नाव टीवी फिल्म्स् होते, ज्यामध्ये ताहिर हुसैन यांनी आमीर खान-जूही चावला या जोडीला घेऊन 'तुम मेरे हो' चित्रपट केला होता, मात्र आमीर खाननेदेखीलआपल्या वडिलांच्या कंपनीच्या जागी स्वत:च्या नावाने निर्मिती कंपनी सुरू केली. संजय दत्तचा किस्साही वेगळा नाही. सुनील दत्त यांनी अजंता आर्टस् नावाच्या बॅनरने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. मात्र आपल्या वडिलांच्या बॅनरला पुढे नेण्याऐवजी संजय दत्तने आपल्या नावाने वेगळी कंपनी सुरू केली. तुषार कपूरबद्दल वृत्त आहे की, तो आपल्या बहिणीची कंपनी बालाजी फिल्मसऐवजी वेगळी कंपनी सुरू करणार आहे.

Web Title: TATA to home production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.