अक्षय कुमारसोबत अॅक्शन सीन्स देताना तापसी पन्नू घाबरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 15:00 IST2017-03-27T09:30:16+5:302017-03-27T15:00:16+5:30

तापसीच्या  म्हणण्यानुसार अभिनेता अक्षय कुमार बरोबर कोणत्याही अॅक्शन चित्रपटात काम करणे खूपच कठीण आहे. कारण अॅक्शन सीन्समध्ये देताना अक्षयचा ...

Tapi Pannu was confronted with giving action sequences to Akshay Kumar | अक्षय कुमारसोबत अॅक्शन सीन्स देताना तापसी पन्नू घाबरली

अक्षय कुमारसोबत अॅक्शन सीन्स देताना तापसी पन्नू घाबरली

पसीच्या  म्हणण्यानुसार अभिनेता अक्षय कुमार बरोबर कोणत्याही अॅक्शन चित्रपटात काम करणे खूपच कठीण आहे. कारण अॅक्शन सीन्समध्ये देताना अक्षयचा हात कुणी धरु शकत नाही. असे तापसीचे म्हणणे आहे. 

या चित्रपटात मला अॅक्शन सीन्सचे प्रशिक्षण देण्यासाठी अक्षयनेचे प्रशिक्षक पाठवला होता.अक्षय कुमारकडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा आहेत. अक्षयकुमार जर एखादा अॅक्शन चित्रपटात काम करतो आहे तर त्या चित्रपटातील अॅक्शन सीन्स खूपच डेंजर्स असतात. त्यामुळे अॅक्शन चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या अक्षय कुमारकडून खूप अपेक्षा असतात. याआधी अक्षय बरोबर तापसीने बेबी या चित्रपटातदेखील काम केले होते. अक्षय खूपच शांतवृत्तीचा व्यक्ती असल्याचा तापसी म्हणते त्याच्या एवढा शांत माणूस आपण अजूनपर्यंत बघितले नसल्याचे तिचे मतं आहे. तो कधीच कुणावर सेटवर चिडत नाही असे ही ती म्हणाली आहे. बेबी या चित्रपटातून तापसीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

शिवम नायर दिग्दर्शित नाम शबाना या चित्रपटात करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र मला देण्यात आलेल्या  अॅक्शन सीन्सबद्दलच्या प्रशिक्षणामुळे मला ते सोप्प गेले. शबाना हा एक महिलांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचा आपण एक भाग असल्याचा तापसीला अभिमान असल्याचे तिने सांगितले आहे.  याचित्रपटात तापसीसह मनोज वाजपेयी, अनुपम खेर हेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 31 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Tapi Pannu was confronted with giving action sequences to Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.