फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:36 AM2022-03-01T11:36:20+5:302022-03-01T11:55:34+5:30

सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुरडीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanushree dutta childhood photo creating buzz on social media fans said cutipie | फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती अभिनेत्री?

फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती अभिनेत्री?

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुरडीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मोठ्या डोळ्यांच्या चिमुरडीने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. एक काळ असा होता की ही मुलगी प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली होती. अनेक सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम केला. तरीही तुम्ही ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही मुलगी दुसरी कोणी नसून आशिक बनाया आपने (Aashiq Banaya Aapne) , फेम तनुश्री दत्ता(Tanushree Dutta) आहे. 

तनुश्री दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो (Tanushree Dutta Instagram Story)  शेअर केला आहे. तनुश्री दत्ता बॉलिवूडमध्ये शेवटची 2010 मध्ये रामा: द सेव्हिअर या चित्रपटात दिसली होती. २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती 'चॉकलेट', 'ढोल', 'रिस्क','स्पीड' अशा विविध सिनेमातही झळकली.

मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्रीचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं. करियरमध्ये मिळणारं अपयश तनुश्रीला रूचलं नाही. ती निराश झाली होती.

 

Web Title: Tanushree dutta childhood photo creating buzz on social media fans said cutipie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.