​‘तम्मा तम्मा’ अगेन रिलीज : बद्रिनाथ व दुल्हनीयाचा धमाकेदार परर्फामन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 15:59 IST2017-02-11T10:29:22+5:302017-02-11T15:59:22+5:30

‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या चित्रपटात ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे नव्याने रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्याला रॅपर बादशाहने आपला आवाज दिला

'Tamma Tamma' Again Release: Badrinath and Bridegroom's Explosive Performance | ​‘तम्मा तम्मा’ अगेन रिलीज : बद्रिनाथ व दुल्हनीयाचा धमाकेदार परर्फामन्स

​‘तम्मा तम्मा’ अगेन रिलीज : बद्रिनाथ व दुल्हनीयाचा धमाकेदार परर्फामन्स

लिवूड स्टार अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बद्रिनाथ की दुल्हनीया या चित्रपटातील बहुचर्चित तम्मा तम्मा हे रिमिक्स गाणे रिलीज करण्यात आले आहे. ९० च्या दशकातील ‘तम्मा तम्मा’ सुपरहिट डान्स नंबरवर तुुमचे पाय थिरकतील यात शंकाच नाही कारण हे गाणे तेवढ्याच धमाकेदार पद्धतीने सादर करण्यात आले आहे. 

धर्मा प्रोडक्शनचा ‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ हा चित्रपट पुढिल महिन्यात रिलीज होत असल्याने या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे. अभिनेता वरुण धवन व आलिया भट्ट पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता लागली होती. बद्रिनाथमधील पहिले गाणे रिलीज झाल्यावर तम्मा तम्मा या रिमिक्सची जोरदार चर्चा होत होती. दरम्यान आलिया भट्टने सोशल मीडियाहून ‘तम्मा तम्मा’ या गाण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने शिकविलेला डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. 



 आज रिलीज करण्यात आलेले ‘बद्रिनाथ कि दुल्हनिया’ या चित्रपटात ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे नव्याने रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्याला रॅपर बादशाहने आपला आवाज दिला असून  तनिष्क बागचीने हे गाण्यासाठी रिमिक्स केले आहे, विशेष म्हणजे मूळ गाण्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या रिमिक्स वर्जन मध्ये आलिया भट्ट व वरुणच्या नृत्य शैलीमध्ये मात्र काही धम्माल स्टेप्स पाहायला मिळत आहे. हे गाणे धमाल पार्टी साँग ठरल्यास आश्यर्च वाटू नये. 

अभिनेता संजय दत्त व धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या १९८९ साली रिलीज झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. या गाण्याला अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहिरी यांनी गायले होते. या गाण्यातील माधुरी दिक्षित व संजय दत्त यांच्या आगाळ्या वेगळ्या नृत्य शैलीने तर अनेकांना वेडच लावले होते. या गाण्यासाठी माधुरीने आलिया व वरुणला डान्स शिकविल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल ठरला होता. 

Web Title: 'Tamma Tamma' Again Release: Badrinath and Bridegroom's Explosive Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.