टॅलेंट व टीमवर्कच ठरले बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:16 IST2016-01-16T01:07:57+5:302016-02-10T09:16:55+5:30

2015 या वर्षांत अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. काही आपल्या बजेटमुळे चर्चेत राहिले तर काही आपल्या कमाईमुळे. विशेष ...

Talent and teamwork are the best | टॅलेंट व टीमवर्कच ठरले बेस्ट

टॅलेंट व टीमवर्कच ठरले बेस्ट

2015
या वर्षांत अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. काही आपल्या बजेटमुळे चर्चेत राहिले तर काही आपल्या कमाईमुळे. विशेष म्हणजे, सलमान खान यावर्षीचा मोठा स्टार ठरला. सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटात पहिल्या व दुसर्‍या स्थानावर त्याचेच चित्रपट आहेत. सलमानच्या दोन्ही चित्रपटांनी 527 कोटींची कमाई केली. शाहरुख खान, वरून धवन यांच्याही चित्रपटांनी चांगली कमाई केली. बॉलिवूडमध्ये आता नंबर गेमला महत्त्व मिळाले असले तरी देखील 'टॅलेंट' हाच एकमेव यशाचा निकष आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. केवळ मोठी नावे हिच यशाची गुरुकिल्ली आहे असे नाहीच. शाहरुख, सलमान किंवा आमिर खान यांच्या चित्रपटांना टॅलेंटेड दिग्दर्शकाने हाताळले नाही तर काय होऊ शकते याची जाणीव 'दिलवाले'ने करून दिली. तर टॅलेंटड अँक्टर व डायरेक्टरचा मिलाफ यशाची नवी शिखरे पादाक्रांत करू शकतो हे पीकेच्या यशावरून स्पष्ट झाले. जाणकार दिग्दर्शकाने स्टारक डून मेहनत करून घेतली तर काय होऊ शकते, हे बजरंगी भाईजानने दाखवून दिले. टीमवर्कमुळे छान असेल तर यश कसे पायाशी लोळण घालते याचे उत्तम उदाहरण म्हणजे तनू वेड्स मनू रिटन्स् आहे.

कमी कालावधीत 100 कोटी क्लबमध्ये
चित्रपटांच्या कमाईच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कमी कलावधीत 100 कोटी क्लबमध्ये सामील होणार्‍या चित्रपटांना विशेष स्थान दिले जाते. यात खान्सचा बोलबाला कायम होताच.
चित्रपट 100 कोटी (दिवस) एकूण कमाई
हॅप्पी न्यू ईअर 3 205.00
बजरंगी भाईजान 3 320.34
धूम 3 3 280.25
प्रेम रतन धन पायो 3 207.40*
चेन्नई एक्स्प्रेस 3+ 226.70
पीके 4 339.50 अक्षय पैसा वसूल करणारा स्टार
अक्षय कुमारचे या वर्षी चार चित्रपट प्रदर्शित झाले. हे सर्वच चित्रपट चांगली कमाई करणारे ठरले. सर्वाधिक कमाई करणार्‍या पहिल्या दहा चित्रपटात अक्षयच्या सर्व चित्रपटांची वर्णी लागलीआहे. बेबी, सिंग इज ब्लिंग, गब्बर इज बॅक व ब्रदर हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्याच्या चारही चित्रपटांनी एकूण 350 कोटीहून अधिकचा गल्ला जमविला.

Web Title: Talent and teamwork are the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.