बाबो! अजय देवगणमुळे तब्बू आज आहे अविवाहित, अभिनेत्री केला होता हा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 13:04 IST2021-04-02T12:45:08+5:302021-04-02T13:04:14+5:30
Ajay devgn birthday know the throwback interview of tabu : तब्बूने आपल्या सिंगल राहण्यामागचे कारण अजय देवगण असल्याचे सांगितले होते.

बाबो! अजय देवगणमुळे तब्बू आज आहे अविवाहित, अभिनेत्री केला होता हा खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. अजयचे नाव बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीत येते. कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्स आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पर्सनल लाईफ इतकाच अजय त्याच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन देखील अनेकदा चर्चेत राहिला आहे.
अजय देवगन आणि तब्बूची जोडी चाहत्यांना ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीनसुद्धा आवडली. तब्बूचा पहिला चित्रपट 'विजयपथ' होता आणि 'रुक, रुक, रुक अरे बाबा रुक' या चित्रपटाचे एक गाणे खूप लोकप्रिय झाली.
2017मध्ये एका मुलाखती दरम्यान तब्बूने आपल्या सिंगल राहण्यामागचे कारण अजय देवगण असल्याचे सांगितले होते. तब्बू आणि अजय देवगण यांची २५ वर्षांपासूनची ओळख आहे. अजय हा तब्बूचा चुलत भाऊ समीर आर्याचा शेजारी होता. त्यामुळे तब्बू आणि अजय यांची अनेक वर्षांपासून खूपच चांगली मैत्री आहे. तिने या मुलाखतीत सांगितले होते की, अजय आणि समीर हे दोघंही सतत माझ्यावर नजर ठेवून असायचे, जिथे मी जायचे तिथे ते माझा पाठलाग करायचे. या दोघांमुळे इतर मुलांशी बोलण्याचीही भीती वाटायची. जर एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते दोघंही त्याला मारण्याची धमकी द्यायचे. दोघंही खूप मस्तीखोर होते. आजही मी अविवाहित आहे याला फक्त आणि फक्त अजयच जबाबदार आहे.