तब्बू म्हणतेय, चित्रपटांनंतर आता या गोष्टीत आहे मला रस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 14:34 IST2017-10-30T09:04:51+5:302017-10-30T14:34:51+5:30
गोलमाल अगेन या चित्रपटात प्रेक्षकांना नुकतेच तब्बूला पाहायला मिळाले आहे. तब्बू एका वेगळ्या अंदाजात या चित्रपटात प्रेक्षकांना दिसली होती. ...
.jpg)
तब्बू म्हणतेय, चित्रपटांनंतर आता या गोष्टीत आहे मला रस
ग लमाल अगेन या चित्रपटात प्रेक्षकांना नुकतेच तब्बूला पाहायला मिळाले आहे. तब्बू एका वेगळ्या अंदाजात या चित्रपटात प्रेक्षकांना दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तब्बू गेली अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत आहे. तब्बूने विजयपथ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्यानंतर माचिस, विरासत, चांदनी बार, अस्तित्व, चीनी कम यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या. माचिस, चांदनी बार यांसारख्या तिच्या चित्रपटांतील भूमिकांना तर राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर आता एका दुसऱ्या गोष्टीत तब्बूला रस आहे आणि तब्बूनेच ती गोष्ट नुकतीच तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, फराह खान, अक्षय कुमार यांसारखे मोठ्या पडद्यावरचे सगळेच प्रसिद्ध कलाकार सध्या छोट्या पडद्यावर आपले नशीब आजमवताना दिसत आहेत. या सगळ्यांनाच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. बॉलिवूड कलाकारांचा हा छोट्या पडद्यावरील प्रवास पाहाता तब्बूला देखील छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा आहे आणि तिने ही इच्छा बोलून देखील दाखवली आहे. तिला छोट्या पडद्यावर काम करायचे असून एखाद्या रिअॅलिटी शो मध्ये झळकायचे आहे. याविषयी तब्बू सांगते, मला छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा आहे आणि त्यातही छोट्या पडद्यावर मला एखादा ट्रव्हलिंगशी संबंधित कार्यक्रमात काम करायचे आहे. मला स्वतःला फिरायला आवडते. त्यामुळे मला या कार्यक्रमामुळे जगभर फिरता येईल. मी अनेक देश पाहिले आहेत पण आजवर दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका हे देश कधी पाहिले नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमाद्वारे मी या ठिकाणांना नक्कीच भेट देईन. मला एअर होस्टेस बनून संपूर्ण जग फिरण्याची इच्छा होती. पण माझी ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. पण रिअॅलिटी शो द्वारे जगभर फिरण्याची इच्छा पूर्ण करायचे असे मी ठरवले आहे. त्यामुळे भविष्यात अशा एखाद्या कार्यक्रमाची ऑफर मला आल्यास मी ती नक्कीच स्वीकारेन.
Also Read : या कारणामुळे तब्बू नेहमीच तयार असणार अजय देवगणसोबत काम करण्यासाठी