तब्बू आणि आयुषमानची जोडी झळकणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 16:10 IST2017-06-15T10:40:07+5:302017-06-15T16:10:07+5:30

तुम्हाला राज कपूर यांच्या 420 या चित्रपटातील मुड मुड के ना देख हे गाणं तरी नक्कीच माहिती असेलच. त्यावेळी ...

Tabu and Aishwarya pair will be seen in this film | तब्बू आणि आयुषमानची जोडी झळकणार या चित्रपटात

तब्बू आणि आयुषमानची जोडी झळकणार या चित्रपटात

म्हाला राज कपूर यांच्या 420 या चित्रपटातील मुड मुड के ना देख हे गाणं तरी नक्कीच माहिती असेलच. त्यावेळी या गाण्यांने सगळ्यांना वेड लावले होते. आता लवकरच पुन्हा एकदा हे गाणं आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. परंतु यावेळी हे गाणे एक चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपटाचे नाव मुड मुड के ना देख आहे. या चित्रपटात  अभिनेत्री तब्बू आणि आयुषमान खुराना यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रीराम राघवन यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठा तब्बू आणि आयुषमानच्या जोडीचे नाव फायनल केले आहे. याचित्रपटाचे शूटिंग पुण्यातमध्ये सुरु आहे. बदलापूर चित्रपटाननंतर जवळपास दोन वर्षांनी दिग्दर्शक श्रीराम आपला पुढचा चित्रपट घेऊन येतायेत. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा तब्बू आणि आयुषमान खुराना यांची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तब्बूपेक्षा आयुषमान 13 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे तब्बू आणि आयुषमानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. हा एक थ्रीलर चित्रपट असल्याचे कळते आहे.  

याआधी श्रीराम हा आलिया भट्ट आणि अक्षयकुमार यांच्या जोडीला घेऊऩ चित्रपट तयार करत असल्याचे कानावर आले होते. आयुषमान खुरानाचा काही दिवसांपूर्वी मेरी प्यारी बिंदू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर तब्बू फितूरमध्ये दिसली होती  त्यानंतर ती रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल-4 या आगामी चित्रपटात दिसणार आहे. आयुषमानने एका मुलाखती दरम्यान आपले तब्बूवर क्रेश असल्याची कबुली दिली होती.  

Web Title: Tabu and Aishwarya pair will be seen in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.