​सुश्मिता सेनची लेक रेनी झाली १८ वर्षांची! पाहा, पार्टी सेलिब्रेशनचे Inside Photo!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 11:21 IST2017-09-06T05:51:59+5:302017-09-06T11:21:59+5:30

सुश्मिता सेन हिची मुलगी रेनीने नुकतेच वयाचे १८ वर्षे पूर्ण केलीत. सोमवारी रेनीचा वाढदिवस साजरा झाला. रेनी, सुश्मिता या ...

Sushmita Sen was born 18 years old Renu Lake! Look at Party Celebration Inside Photo !! | ​सुश्मिता सेनची लेक रेनी झाली १८ वर्षांची! पाहा, पार्टी सेलिब्रेशनचे Inside Photo!!

​सुश्मिता सेनची लेक रेनी झाली १८ वर्षांची! पाहा, पार्टी सेलिब्रेशनचे Inside Photo!!

श्मिता सेन हिची मुलगी रेनीने नुकतेच वयाचे १८ वर्षे पूर्ण केलीत. सोमवारी रेनीचा वाढदिवस साजरा झाला. रेनी, सुश्मिता या मायलेकींनी अख्ख्या कुटुंबासोबत सेलिब्रेट केले. या सेलिब्रेशनचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात सुश्मिता व रेनी दोघीही पार्टी मूडमध्ये दिसत आहेत.
ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत असलेल्या सुश्मिताच्या हातात वाईनचा ग्लास आहे. तिच्याच बाजूला पीच कलरच्या ड्रेसमध्ये रेनी बसलेली आहे. या फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे मायलेकी दोघींनीही ही पार्टी मस्तपैकी एन्जॉय केलीय.



रेनीचा फोटो सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत एक इमोशनल पोस्ट तिने लिहिलीय. रेनीसोबत मी सुद्धा १८ वर्षांनी झाली. एक आई म्हणून मी सुद्धा १८ वर्षांचा सुंदर प्रवास पूर्ण केला, असे तिने लिहिलेय.


सध्या चित्रपटांपासून दूर असलेली सुश्मिता आपल्या दोन्ही मुलींसोबत मस्ती करताना सर्रास दिसत असते. रेनी व अलीसा या दोघी सुश्मिताच्या दत्तक मुली आहेत. सुश्मिताचे आयुष्य या दोघींभोवती फिरते.



ALSO READ : सुश्मिता सेनने ‘या’ क्रिकेटपटूला म्हटले, ‘आय लव्ह यू’!

१९९४ मध्ये सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावावर केला होता. मिस युनिव्हर्सचा किताब मिळवणारी ती पहिली भारतीय होती. त्यापूर्वी सुश्मिताने मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या रायला हरवले होते. मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर सुश्मिताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘बीवी नंबर1’,‘मैंने प्यार क्यों किया’,‘मैं हू ना’,‘फिलहान’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. काही बंगाली सिनेमेही तिने केले. २०१० ते २०१३ पर्यंत सुश्मिताने ‘आय एम शी’ पीजेंटचे आयोजन केले. यामाध्यमातून मिस युनिव्हर्ससाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाºया तरूणींची निवड केली जात होती.

Web Title: Sushmita Sen was born 18 years old Renu Lake! Look at Party Celebration Inside Photo !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.