​सुश्मिता सेन म्हणते, मी ‘सीझन’ फॉलो करत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:40 IST2017-02-12T12:10:26+5:302017-02-12T17:40:26+5:30

माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. कधीही कुणाची पर्वा न करणारी आणि आपल्याच मस्तीत जगणारी सुश्मिता ...

Sushmita Sen says, I do not follow 'Season'! | ​सुश्मिता सेन म्हणते, मी ‘सीझन’ फॉलो करत नाही!

​सुश्मिता सेन म्हणते, मी ‘सीझन’ फॉलो करत नाही!

जी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. कधीही कुणाची पर्वा न करणारी आणि आपल्याच मस्तीत जगणारी सुश्मिता नेहमी स्वत:च्या अटींवरच जगत आलीय. अगदी लग्नापूर्वी मुली दत्तक घेण्याच्या निर्णयापासून तर फॅशनपर्यंत. खरे तर बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री फॅशनबद्दल अतिशय जागृत दिसते. पण सुश्मिताचे तसे नाही. मी फॅशनची फारशी चिंता करीत नाही. कारण मी ‘सीझन’ फॉलो करत नाही. फॅशनबद्दल माझे काहीही नियम नाही. जर हिरवा रंग फॅशनमध्ये असेल तर कदाचित मी तुम्हाला नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसेल. मी स्वत: तरी स्वत:ला फॅशन कॉन्सिअस समजत नाही. अर्थात मी फॅशनबद्दल सजग असते. पण त्याची फार चिंताबिंता करत नाही, असे बिनधास्त सुश्मिता बोलते, ते याचमुळे.
एका मुलाखतीत सुश्मिता तिच्या फॅशन सेन्सबद्दल मनमोकळेपणे बोलली. मला शॉपिंग करायला आवडते. फॅशन ट्रेंड काय, याकडे माझे लक्ष असते. पण मी ते फॉलो करेलच, असे काहीही नाही. मला ‘फॅशन कॉन्सिअस’ म्हणण्यापेक्षा ‘स्टाईलिश’ म्हटलेले आवडेल. कारण तोच शब्द मला अधिक लागू होतो. माझी स्वत:ची एक स्टाईल आहे, असे सुश्मिता यावेळी म्हणाली.

ALSO READ : सुश्मिता सेनचे होणार ‘शॉर्ट’ दर्शन!!

हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलही ती बोलली. हिंदी चित्रपटसृष्टी सौंदर्य आणि वयापेक्षा अलीकडे प्रतिभेला महत्त्व देऊ लागली आहे. ‘इंग्लिश-विंग्लिश’मधील श्रीदेवी त्याचे उत्तम उदाहरण आहे. वयासोबत कलाकाराचे करिअर संपत असेल तर माझ्यामते, यापेक्षा दुर्दैवी काहीही नाही. पण सुदैवाने आपली फिल्म इंडस्ट्री अधिक प्रगल्भ झालीय आणि इथे प्रत्येकासाठी भूमिका आहेत. आपल्याला केवळ या इंडस्ट्रीत सकारात्मक राहायचे आहे, एवढेच, असेही तिने म्हटली.
सुश्मिता सेन अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही. २०१० मध्ये ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती.


Web Title: Sushmita Sen says, I do not follow 'Season'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.