सुष्मिता सेनच्या वर्कआऊट व्हिडिओची इंटरनेटवर धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 16:17 IST2019-11-07T16:11:06+5:302019-11-07T16:17:16+5:30
भिनेत्री सुष्मिता सेन सध्या आपल्या लव्ह लाईफला घेऊन फिटनेसला घेऊन चर्चेत असते.

सुष्मिता सेनच्या वर्कआऊट व्हिडिओची इंटरनेटवर धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या आपल्या लव्ह लाईफला घेऊन फिटनेसला घेऊन चर्चेत असते.सध्या तिचा एक जिम व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत सुष्मिता जिम्नॅस्टिक रिंग्सच्या मदतीने पूशअप करताना दिसत आहे. सुष्मिताने तिचा हा जिम व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सुष्मिताची फिटनेससाठीची मेहनत पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. वयाच्या 43 व्या वर्षी सुष्मिताचा अंदाज हा भल्या भल्यांच्या भुवया उंचावण्यास भाग पाडतो. सोशल मीडियावर तिला सतत अॅक्टीव्ह राहायला आवडतं.
सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. चर्चा खरी मानाल तर, रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे.
रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती.
रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली.