'सुश्मिता सेन पहिल्यापासूनच आहे माझी प्रेरणास्रोत', नवदीप कौर मिसेस वर्ल्ड २०२०-२१साठी करणार भारताचे प्रतिनिधीत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:50 PM2021-10-20T18:50:55+5:302021-10-20T18:51:44+5:30

नवदीप कौर मिसेस वर्ल्ड २०२१च्या भव्य मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'Sushmita Sen has always been my source of inspiration', Navdeep Kaur to represent India for Mrs. World 2020-21 | 'सुश्मिता सेन पहिल्यापासूनच आहे माझी प्रेरणास्रोत', नवदीप कौर मिसेस वर्ल्ड २०२०-२१साठी करणार भारताचे प्रतिनिधीत्व

'सुश्मिता सेन पहिल्यापासूनच आहे माझी प्रेरणास्रोत', नवदीप कौर मिसेस वर्ल्ड २०२०-२१साठी करणार भारताचे प्रतिनिधीत्व

googlenewsNext

मिसेस नवदीप कौरसाठी तो खरोखर एक गौरवास्पद क्षण होता जेव्हा या वर्षातील मिसेस इंडिया वर्ल्ड २०२०- २०२१ या एका अत्यंत भव्य स्पर्धेची विजेती म्हणून ती मुकुटाची मानकरी ठरली. आता ती मिसेस वर्ल्ड २०२१च्या भव्य मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे, जी स्पर्धा १५ जानेवारी २०२२ रोजी लास वेगास, नेवाडा येथे योजण्यात आली आहे.

मिसेस वर्ल्ड ही विवाहित स्त्रियांसाठीची जगातील पहिली सौंदर्य स्पर्धा आहे, जी १९८४ मध्ये सुरू झाली होती आणि ८० देशांत तिचे संचालक आहेत. ही सौंदर्य स्पर्धा स्त्रीमधील क्षमता ओळखून त्यावर तसेच तिच्या परिवर्तनाचा प्रवास आणि स्व-विकास यावर फोकस करते. ही स्पर्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रातील स्त्रियांना त्यांचे सौंदर्य, मूल्ये आणि वंश जोपासून ताठ मानेने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मदत करते. या स्पर्धेचे मिशन अस्सल सौंदर्य आणि विचार करण्याची आणि सृजन करण्याची क्षमता साजरी करण्यासाठी लक्षावधी स्त्रियांना प्रोत्साहित आणि प्रेरित करणे हे आहे.  

ओदिशाच्या स्टील हबमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या नवदीपकडे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची मास्टर डिग्री असून ती एक कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला असून जसलीन या पाच वर्षांच्या मुलीची ती आई आहे. व्यावसायिक दृष्ट्या ती गेली ६ वर्षे शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. कोटक महिंद्रा बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कारकिर्दीची सुरूवात केल्यानंतर ती एका मॅनेजमेंट संस्थेत असिस्टंट प्रोफेसर म्हणून एचआर आणि मार्केटिंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विषय शिकवू लागली. सध्या ती एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून काम करत आहे.

या आनंददायक प्रसंगी बोलताना नवदीप कौर म्हणाली, “सुष्मिता सेनने आपल्या देशाला जो गौरव मिळवून दिला आणि जगाच्या नकाशात आपल्या देशाला अढळ स्थान मिळवून दिले, त्यामुळे मी अगदी लहानपणापासून मोहित झाले होते. महिलांना प्रेरित करण्याजोगे कर्तृत्व गाजवण्याचे आणि आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या देशाला बहुमान मिळवून देण्याचे स्वप्न मी नेहमी पाहिले आहे. आत्ता तर मी जणू स्वप्नातच आहे असे मला वाटते आहे. मिसेस वर्ल्ड मंचावर श्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी मी प्रत्येक पैलूवर काम करत आहे.”

लेडीज सर्कल इंडिया, रूरकेला सिटी लेडीज सर्कल १७२ या आंतरराष्ट्रीय संस्थेशी नवदीप संलग्न आहे, जेथे सम-विचारी महिला वंचित मुलांना शिक्षण मिळवून देण्यास मदत करतात. आपला खारीचा वाटा उचलून हे जग जगण्यासाठी अधिक सुंदर बनविण्याची तिची आकांक्षा आहे. मिसेस वर्ल्ड २०२१ मध्ये लोकांचे मन जिंकून देशाची मान उंचवण्याच्या मनिषेने ती दररोज कठोर परिश्रम करत आहे.

Web Title: 'Sushmita Sen has always been my source of inspiration', Navdeep Kaur to represent India for Mrs. World 2020-21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.