सुशांतच्या हजेरीत धोनी झाला विक्रमादित्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 00:15 IST2016-10-23T21:30:37+5:302016-10-24T00:15:12+5:30

सुशांत सिंग राजपूत सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला आता चर्चेत राहणे चांगलेच ठाऊक झालेय असेही म्हणायला काहीच हरकत नाही. ...

Sushant's presence in the memory of Vikramaditya! | सुशांतच्या हजेरीत धोनी झाला विक्रमादित्य!

सुशांतच्या हजेरीत धोनी झाला विक्रमादित्य!

ong>सुशांत सिंग राजपूत सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला आता चर्चेत राहणे चांगलेच ठाऊक झालेय असेही म्हणायला काहीच हरकत नाही. भारत-न्यूझिलंड यांच्यात मोहाली येथील क्रिकेट सामन्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतने हजेरी लावली आहे. यामुळे रिअल व रिल लाईफमधील धोनी एकाच मैदानावर दिसून आले. भारताने न्यूझिलंडवर सात गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात रिअल लाईफमधील धोनी रिललाईफमधील धोनीसमोर विक्रमादित्य ठरला.

सुशांत सिंग राजपूत याने भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीवर आधारित ‘एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे कौतुक होत आहेच. खुद्द धोनीने सुशांतची प्रसंशा केली आहे. मोहाली येथील भारत न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसºया एकदिवशीय सामन्यात सुशांत राजपूत उपस्थिती होता. यामुळे ट्विटरवर दिवसभर ही बातमी चांगलीच  ट्रेंड झाली. धोनीचा बायोपिक  चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी व सुशांत सिंग राजपूर क्रिकेट सामन्याच्यावेळी एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ होती. त्यामुळे या भेटीची बातमी चांगलीच व्हायरल झाली. 



भारतीय संघाने न्यूझिलंडवर सात गड्यांनी मात केली. यासामन्यात कप्तान महेंद्रसिंग धोनीने ८० धावा करीत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्याने विराट कोहलीसह १५१ धावांची भागीदारी केली. धोनीच्या ८० धावांच्या खेळीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावी केले. एकदिवसीय सामन्यात त्याने  ९००० धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो भारतातील पहिला व जगातला तिसरा यष्टीरक्षक व भारतीय संघातील पाचवा फलंदाज ठरला. धोनीने सचीन तेंदुलकरचा १९५ षटकारांचा विक्र म मोडला. धोनी सर्वाधिक षटकार लगावणार भारतीय खेळाडू ठरला आहे. सुशांतला धोनीच्या विक्रमांचे साक्षीदार होता आले. दुसरीकडे बॉक्स आॅफिसवरही ‘एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने नवे विक्रम स्थापित केले आहे. सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक म्हणून तर २०१६ या वर्षांतील दुसरा चित्रपट ठरला. या चित्रपटाने २०० कोटीच्यावर कमाई केली आहे. 

धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांत सिंग राजपूतने चांगलीच मेहनत घेतली होती. विशेषत: धोनीचा फेव्हरेट हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी त्याला चांगलाच घाम जिरवावा लागला होता. किरण मोरे यांनी सुशांतला क्रिकेटचे धडे दिले होते. सुशांतने धोनीची स्टाईल हुबेहुब आत्मसाद केली. 

Web Title: Sushant's presence in the memory of Vikramaditya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.