सुशांत सिंग पुन्हा झाला ‘राजपूत’; ट्रोल करणाºयांना खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 14:05 IST2017-01-31T08:35:19+5:302017-01-31T14:05:19+5:30

बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना मारहाण केल्याप्रकरणानंतर त्यांना समर्थन देताना सुशांत सिंग राजपूतने आपले ‘राजपूत’ आडनाव काढल्यानंतर पुन्हा ...

Sushant Singh turns 'Rajput'; Crushing trolls | सुशांत सिंग पुन्हा झाला ‘राजपूत’; ट्रोल करणाºयांना खडसावले

सुशांत सिंग पुन्हा झाला ‘राजपूत’; ट्रोल करणाºयांना खडसावले

लिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना मारहाण केल्याप्रकरणानंतर त्यांना समर्थन देताना सुशांत सिंग राजपूतने आपले ‘राजपूत’ आडनाव काढल्यानंतर पुन्हा ते लावणार असल्याचे सांगितले. त्याच्या आडनाव लावण्याच्या निर्णयावर अनेकांनी त्याच्यावर ट्विट करीत टीका केली. त्यावर सुशांतने ‘तुम्ही माझी काळजी करु नका, माझ्याकडे अनेक चित्रपट आहेत, असे खडसावले.
‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगप्रसंगी राजपूत करणी सेनेने चुकीचा इतिहास दर्शविला जात असल्याबद्दल संजय लीला भन्साली यांना मारहाण केली. त्याचे बॉलिवूडमध्ये जोरदार पडसाद उमटले. एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या सुशांत सिंग राजपूतने आपले ‘राजपूत’ हे आडनाव काढून टाकल्याची घोषणा केली होती. आता सुशांतने पुन्हा हे आडनाव आपल्या नावापुढे लावणार असल्याचे घोषित केले. आडनाव काढण्याच्या सुशांत सिंगच्या कृतीचे अनेकांनी समर्थन केले. चाहत्यांनीही त्याच्या या घोषणेचे स्वागत केले. आता पुन्हा आडनाव लावणार असल्याचे सांगितल्यावर ट्विटरवर त्याला ट्रोल करण्यात आले. अनेकांनी सुशांतच्या या भूमिकेवर आपला राग व्यक्त केला. आपल्या निर्णयावर तो टिकू शकला नसल्याचे सांगण्यात आले. 
 
धर्म आणि नाव बदलण्याविषयी विचारणाºयांवर सुशांतने मत व्यक्त केले. ‘मूर्ख माणसा, मी आपले आडनाव बदललेले नाही. ज्या ठिकाणी हिम्मत दाखविण्याची वेळ येईल त्याठिकाणी मी तुझ्यापेक्षा १० पट अधिक राजपूत आहे हे सिद्ध करेन. मी अशा भ्याड कृत्याविरुद्ध आहे.’
 
काहींनी नाव बदलण्याबाबत टीका केली होती, त्यावर ‘तुझ्या आयुष्यापेक्षा अधिक चित्रपट माझ्याजवळ आहेत. याची फार काळजी करू नकोस, जा आता झोप’ असे खडसावले.
 
आपल्या आडनावामुळे त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. तुमच्यात जर क्षमता असेल तर तुमचे पहिले नाव तुुम्ही वापराल, असे सांगत त्याने आपले नाव ‘सुशांत’ असे ठेवले होते. दोन दिवसानंतर सुशांतने ट्विटरवर आपले आडनाव काढून टाकले होते. आता पुन्हा आपले आडनाव लावण्याचा निर्णय त्याने घेतला.






 

Web Title: Sushant Singh turns 'Rajput'; Crushing trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.