सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 13:26 IST2020-12-20T13:25:58+5:302020-12-20T13:26:45+5:30
रुग्णालयातला त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या 14 जूनला कथितरित्या आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूला 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला. पण अद्यापही चाहते त्याला विसरले नाहीत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडिल के. के. सिंग यांनी आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण सध्या ते रूग्णालयात भरती आहेत. अलीकडे त्यांची प्रकृती अचानक बिघडली, यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयातला त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये स्वत: केके सिंग आणि सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितू सिंह दिसून येत आहेत. फोटोग्राफरला पोज देताना मितू व प्रियांका हसत आहेत. के. के. सिंग यांच्या चेह-यावरही हसू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या वडिलांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सुशांतचे चाहते ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत.
14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतने कथितरित्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या आत्महत्येवर काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. सुशांत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘काय पो छे’ या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही त्याने काम केले होते.