​सुशांत सिंह राजपूत बनणार चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 15:18 IST2017-05-12T09:36:42+5:302017-05-12T15:18:16+5:30

‘उडता पंजाब’नंतर अभिषेक चौबे आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तयार आहेत. मात्र यावेळी अभिषेक चौबे ७० च्या दशकातील चंबळ खो-यातील दहशत ...

Sushant Singh Rajput will become a robber in the valley of Chambal! | ​सुशांत सिंह राजपूत बनणार चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर!

​सुशांत सिंह राजपूत बनणार चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर!

डता पंजाब’नंतर अभिषेक चौबे आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तयार आहेत. मात्र यावेळी अभिषेक चौबे ७० च्या दशकातील चंबळ खो-यातील दहशत आपल्या चित्रपटात दाखवणार आहेत. होय, ७० च्या दशकात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांची दहशत होती. हीच दहशत पडद्यावर दाखवण्याचे कौशल्य अभिषेक चौबे पार पाडणार आहेत. या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी म्हणजे, या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची वर्णी लागली आहे. सुशांत या चित्रपटात एका दरोडेखोराच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यप्रदेशातील चंबळ भागात हा सिनेमा शूट होईल. याचवर्षीच्या अखेरीस चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे.
सध्या या चित्रपटावर वेगात काम सुरु आहे. फेबु्रवारी २०१८ पर्यंत शूटींग पूर्ण करण्याचे चौबे यांचे प्रयत्न आहेत. कारण यानंतर याभागात प्रचंड गर्मी असते.
चित्रपटाचे को-रायटर  सुदीप शर्मा यांनी या चित्रपटासाठी चंबळ खोºयात रेकी केली आहे. सोबत येथील काही दरोडेखोरांची मुलाखतही घेतली आहे. यापैकी काहीच्या शिरावर ८० लोकांच्या हत्येचा आरोप आहे. आपल्यापैकी अनेकांनी चंबळच्या खोºयातील दरोडेखोरांबद्दल ऐकले आहे. पण चौबेंच्या चित्रपटात या ऐकीव कथांपेक्षा एक वेगळी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. केवळ वास्तव आणि वास्तव एवढेच या चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाशिवाय सुशांतकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. सुशांत व क्रिती सॅनन या दोघांचा ‘राबता’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. याशिवाय ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात सुशांत लीड रोलमध्ये आहे. यात त्याच्या अपोझिट जॅकलिन फर्नांडिस लीड रोलमध्ये आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput will become a robber in the valley of Chambal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.