सुशांत सिंग राजपूत बनणार निर्माता! बनवणार ‘बेंग्लोर डेज’चा हिंदी रिमेक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:42 AM2018-08-23T10:42:35+5:302018-08-23T10:43:01+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता निर्माता बनण्याच्या तयारीत आहे. आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत एका सुपरहिट साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर सुशांतने काम सुरू केल्याचे कळतेय.

sushant singh rajput is in talks for a hindi remake of south film bangalore days | सुशांत सिंग राजपूत बनणार निर्माता! बनवणार ‘बेंग्लोर डेज’चा हिंदी रिमेक!!

सुशांत सिंग राजपूत बनणार निर्माता! बनवणार ‘बेंग्लोर डेज’चा हिंदी रिमेक!!

googlenewsNext

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता निर्माता बनण्याच्या तयारीत आहे. आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत एका सुपरहिट साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर सुशांतने काम सुरू केल्याचे कळतेय. या चित्रपटाचे हक्क मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
साऊथच्या या सुपरहिट चित्रपटाचे नाव आहे, ‘बेंग्लोर डेज’. २०१४ मध्ये हा मल्याळम चित्रपट रिलीज झाला होता. अभिनेता दुलकर सलमान यात लीड रोलमध्ये होता. सुशांत याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. यात अभिनय करण्यासोबत सुशांत या चित्रपटाचा निर्माता असणार आहे.

 ‘बेंग्लोर डेज’मधील निवीन पॉली ही व्यक्तिरेखा सुशांत साकारू इच्छितो. तूतार्स निर्माता विवेक रंगाचारी यांच्याकडे ‘बेंग्लोर डेज’च्या हिंदी रिमेकचे राईट्स आहेत. सुशांतला हे राईट्स हवे आहेत. आता हे राईट्स सुशांतला मिळतात की रंगाचारी सुशांतसोबत सहनिर्मात्याच्या भूमिकेत दिसतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
‘बेंग्लोर डेज’ हा तीन चुलत भावंडांची कथा आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांची ताटातूट होते. यानंतर अनेक वर्षांनी बेंगळुरूमध्ये ते पुन्हा एकमेकांना भेटतात़ यानंतर ते एकमेकांची कशी सोबत करतात, ते या चित्रपटात दाखवले आहे.
दुलकर सलमानने अलीकडे हिंदी डेब्यू केला. इरफान खान स्टारर ‘कारवां’ या चित्रपटात तो दिसला. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालला नाही. पण यातील दुलकरचा अभिनय मात्र प्रेक्षकांना व समीक्षकांना चांगलाच भावला.

Web Title: sushant singh rajput is in talks for a hindi remake of south film bangalore days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.