IIFA अॅवॉर्ड न मिळाल्याने सुशांत सिंग राजपूने काय केले ट्वीट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 13:15 IST2017-07-17T07:39:51+5:302017-07-17T13:15:04+5:30

न्यूयॉर्कमध्ये नुकतेच संपन्न झालेल्या 18 व्या आयफा अॅवॉर्डला बॉलिवूडमधील सगळ्या कलाकरांनी उपस्थिती लावली होती. आलिया भट्टला उडता पंजाबमधील तिच्या ...

Sushant Singh Rajput did not get the IIFA award tweet? | IIFA अॅवॉर्ड न मिळाल्याने सुशांत सिंग राजपूने काय केले ट्वीट ?

IIFA अॅवॉर्ड न मिळाल्याने सुशांत सिंग राजपूने काय केले ट्वीट ?

यूयॉर्कमध्ये नुकतेच संपन्न झालेल्या 18 व्या आयफा अॅवॉर्डला बॉलिवूडमधील सगळ्या कलाकरांनी उपस्थिती लावली होती. आलिया भट्टला उडता पंजाबमधील तिच्या अभिनयासाठी  सर्तोकृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर शाहिदला उडता पंजाबमधील अभिनयासाठी सर्तोकृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला शाहिदसह सुशांत सिंग राजपूतला देखील या पुरस्कारासाठी नामाकंन मिळाले होते. 'एमएस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला नामाकंन मिळाले होते. मात्र हा अॅवॉर्ड शाहिद कपूरने त्याच्या नावावर केला. शाहिद हा अॅवॉर्ड स्वीकारताना सुशांत सिंग देखील न्यूयॉर्कमध्ये उपस्थित होता. त्यामुळे शाहिदला अॅवॉर्ड मिळाल्यावर दुखावल्या गेलेल्या सुशांतने एक ट्वीट केले. 'आइफा हाहाहाहा' ! असे ट्वीट त्यांने केले आहे. यावरुन सुशांतला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. सुशांतला शाहिदला मिळालेल्या अॅवॉर्ड बाबत खूश व्हायला हवं असे ट्वीटवर प्रतिक्रिया त्याला मिळाल्या, सुशांतला हा अॅवॉर्ड आपल्यालाच मिळेल अशी आशा असावी. मात्र शाहिदचे नाव जाहीर केल्यावर त्याच्या आशेवर पाणी फिरले गेले. 


सुशांतने काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती धोनीच्या बायोपिकमधून. या चित्रपटात त्यांनी साकारलेला धोनी सगळ्यांच भावला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर ही हिट ठरला. त्यामुळे सुशांतच्या अपेक्षा कदाचित वाढल्या असतील. आयफात ही सर्तोकृष्ठ अभिनयाचा पुरस्कार आपल्यालाच मिळेल असे त्याला वाटले असेल. काही दिवसांपूर्वी आलेला राब्ता हा त्याचा चित्रपट सिनेमागृहात आपली कमाल दाखवू शकला नाही. लवकरच तो आगामी चित्रपट चंदा मामा दूर के च्या कामाला सुरुवात करणार आहे. यात तो एका अंतराळवीरची भूमिका साकारणार आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput did not get the IIFA award tweet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.