सुशांत सिंग राजपूतने पहिला टॅटू केला आईला समर्पित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 20:01 IST2016-12-14T20:01:36+5:302016-12-14T20:01:36+5:30
टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करणारा सुशांत सिंग राजपूतला लवकरच बॉलिवूड स्टारडम मिळाले. आता त्याच्या सवयी देखील स्टार ...
.jpg)
सुशांत सिंग राजपूतने पहिला टॅटू केला आईला समर्पित
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या ट्विटरहून पाठीवर काढलेल्या टॅटूचा फ ोटो शेअर केला आहे. हा टॅटू पंचतत्त्वाचा असून यात एक त्रिकोण दिसतो. विशेष म्हणजे हा टॅटू त्याने आपल्या पाठीवर काढला आहे. यात बाळ व आई यांचे रेखाचित्र आहे. या टॅटूच्या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहलेय, ‘पहिला टॅटू : पंचतत्त्व... आई आणि मी’. यावरून त्याच्या जीवनात आईची भूमिका किती महत्त्वाची आहे याची जाणीव होते.
सुशांतसाठी २०१६ हे वर्ष लकी ठरले आहे. यावर्षी त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता. यात त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. या चित्रपटाच्या यशनंतर त्याच्या करिअरला गती मिळाली असून लवकर त्याची भूमिका असलेला राब्ता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात सुशांतच्या अपोझिट क्रिती सेनन दिसणार आहे.
‘एम.एस.धोनी अनटोल्ड स्टोरी’ हिट झाल्याने त्याने आपली फिस वाढविली असल्याचे सांगण्यात येते. आता तो एका चित्रपटासाठी सुमारे १० कोटी रुपये मानधन घेत असून ‘धोनी’च्या बायोपिकसाठी त्याने २ कोटी रुपये मानधन घेतले होते. सुशांत सिंगची प्रमुख भूमिका असलेला ‘राब्ता’ पुढील वर्षी ९ जूनला प्रदर्शित होणार आहे.
The five elements , mother and me.#inkedforlife@sameerpatange#kraayonztattoostudiospic.twitter.com/IHQKQ4unAa— Sushant Singh Rajput (@itsSSR) December 13, 2016 ">http://
}}}}The five elements , mother and me.#inkedforlife@sameerpatange#kraayonztattoostudiospic.twitter.com/IHQKQ4unAa— Sushant Singh Rajput (@itsSSR) December 13, 2016