​- तर चित्रपटात ‘न्यूड’ होण्यास सुशांत सिंह राजपूत राजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:36 IST2017-08-22T10:06:28+5:302017-08-22T15:36:28+5:30

तरूण मनसुखानी दिग्दर्शित ‘ड्राईव्ह’ या सिनेमाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि असायलाही हवी. कारण या चित्रपटात आपण बरेच काही पाहणार ...

- Sushant Singh Rajput convinced to make 'Nude' in the film! | ​- तर चित्रपटात ‘न्यूड’ होण्यास सुशांत सिंह राजपूत राजी!

​- तर चित्रपटात ‘न्यूड’ होण्यास सुशांत सिंह राजपूत राजी!

ूण मनसुखानी दिग्दर्शित ‘ड्राईव्ह’ या सिनेमाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि असायलाही हवी. कारण या चित्रपटात आपण बरेच काही पाहणार आहोत. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे आणि हाच सुशांत आता आमिर खान,जॉन अब्राहम,  राजकुमार राव, रणवीर सिंह यांच्या रांगेत जावून बसणार आहे. होय, म्हणजेच, या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत कॅमेºयासमोर न्यूड होणार असल्याची बातमी आहे.

जॉन अब्राहम ‘दोस्ताना आणि न्यूयॉर्क’ या चित्रपटात न्यूड झाला होता. आमिर खानने ‘पीके’मध्ये अशी पोझ दिली होती.आता सुशांतही ‘ड्राईव्ह’मध्ये अशाच पोझमध्ये दिसणार आहे. पण ही पोझ पूर्णपणे ‘न्यूड’ नाही, असे सुशांतचे म्हणणे आहे.

‘ड्राईव्ह’मधील माझ्या एका सीनची सध्या प्रचंड चर्चा आहे. पण हा पूर्णपणे न्यूड सीन नाही. एकप्रकारे याला भ्रम म्हणता येईल, असे सुशांतने सांगितले. अर्थात न्यूड सीन असता तरीही सुशांतला फारसा फरक पडला नसता. कारण कथेची गरज असेल तर असा सीन करण्यात माझी काहीही हरकत नाही, असे त्याने म्हटले आहे. कॅमेºयासमोर न्यूड सीन देण्यात मी कम्फर्टेबल आहे वा नाही, असे मला विचाराल तर मी याचे उत्तर हो असेच देईल. कथेची गरज म्हणून असे सीन्स चित्रपटात घेतले जातात आणि त्यांना नाही, म्हणण्याचे काहीही कारण नाही. माझे शरिर पडद्यावर दाखवण्यात मला काहीही संकोच वाटत नाही. अर्थात ही कथेची गरज असायला हवी. नाहीतर केवळ सेन्सेशन म्हणून मी असे सीन देणार नाही, असे सुशांत म्हणाला. 
शेवटी सुशांतच्या या बोलण्यात दम तर आहेच. तेव्हा आता ‘ड्राईव्ह’ची प्रतीक्षा करू यात.

ALSO READ : सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर बोलली क्रिती सॅनन!
 

Web Title: - Sushant Singh Rajput convinced to make 'Nude' in the film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.