अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीवर साधला निशाणा?, चर्चेत आली इंस्टाग्रामवरील 'ती' पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 02:46 PM2020-08-21T14:46:25+5:302020-08-21T14:46:45+5:30

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची एक पोस्ट अचानक चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे. 

Sushant Singh Rajput Case News: Ankita Lokhande Instagram Post Dig At Rhea Chakraborty With her latest Instagram post? | अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीवर साधला निशाणा?, चर्चेत आली इंस्टाग्रामवरील 'ती' पोस्ट

अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीवर साधला निशाणा?, चर्चेत आली इंस्टाग्रामवरील 'ती' पोस्ट

googlenewsNext

मुंबईत सीबीआय टीम दाखल झाली असून त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपासून सुशांतचे चाहते सातत्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी करत होते. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण या दरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची एक पोस्ट अचानक चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे. 

अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात एका महिलेने हॅट घातलेली आहे आणि तिच्या हातावर कावळा बसलेला दिसतो आहे. या फोटोवर अंकिताने शॅतारा लिओराच्या प्रसिद्ध ओळी लिहिल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, महिलांना बऱ्याच गोष्टी सांभाळायचे शिकवले जाते, ज्यामुळे ते योग्य आणि अयोग्यचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे मी स्वतःला अनोखं आणि शक्तिशाली ठेवण्याचा मार्ग निवडला आहे आणि हेच सत्य आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, सत्य, इथे वेगळे आणि शक्तिशाली होण्यासाठी आहे.

काही दिवसांपूर्वी समोर आले होते की, सुशांत सिंग राजपूत सोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो अंकिता लोखंडेच्या फ्लॅटचे हप्ते भरत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फ्लॅटची किंमत चार कोटी रुपये सांगितली जाते. हे वृत्त येताच अंकिता लोखंडे हिने सर्वांसमोर सत्य मांडले.

तिने घराच्या कागद पत्रांसोबत आपले बँक स्टेंटमेंटदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यात खुलासा झाला की ती स्वतः या फ्लॅटते हफ्ते भरत होती. तिच्या या पोस्टवर सुशांतच्या बहिणीने तिचे कौतुकदेखील केले होते.

Web Title: Sushant Singh Rajput Case News: Ankita Lokhande Instagram Post Dig At Rhea Chakraborty With her latest Instagram post?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.