सुशांत, कायरा अन् व्हेज सॅन्डवीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:31 IST2016-01-16T01:19:13+5:302016-02-09T08:31:23+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी व त्याची पत्नी साक्षी यांच्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या 'एम.एस.धोनी -द अनटोल्ड स्टोरी' या ...
सुशांत, कायरा अन् व्हेज सॅन्डवीच!
ारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी व त्याची पत्नी साक्षी यांच्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या 'एम.एस.धोनी -द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाची औरंगाबाद शहरात तीन दिवस शूटिंग करण्यात आली. शेवटच्या दिवशी मंगळवारी हॉटेल रामामध्ये विविध सीन शूट करण्यात आले. यापुढील शूटिंग आता दुबई येथे होणार आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा महेंद्रसिंग धोनीच्या तर कायरा आडवाणी साक्षीची भूमिका साकारत आहे. औरंगाबादमध्ये चित्रपटाची शूटिंग सहसा होत नाही. परंतु, चौकार, षटकार ठोकणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची शूटिंग रविवारपासून सुरू झाल्याने,चाहत्यांनी सर्व शूटिंगस्थळी तिन्हीही दिवस मोठी गर्दी केली होती.
न्यू आदर्श हॉटेलमधील शूटिंगनंतर ही चमू जालना रोडवरील रामा इंटरनॅशलमध्ये दाखल झाली. या ठिकाणी दिवसभर सेटअप लावण्याचे काम करण्यात आले. काही स्थानिक रिक्षावाल्यांनाही रोल देण्यात आल्याने तेही या ठिकाणी रिक्षा घेऊन दाखल झाले होते. रिक्षात बसण्याची कित्येकदा ट्रायल घेण्यात आली. सायंकाळी हे दोघे बेडरूममध्ये प्रवेश करीत असल्याच्या दृश्यासंह रिक्षात बसतांना व उतारतांनाही काही दृश्ये शूट करण्यात आली. रामामधील शूटिंगनंतर ही चमू शहरातून रात्रीला रवाना झाली. शहर व परिसरात अनेकदा चित्रपटाची शूटिंग करण्यात येते. परंतु, त्याबाबत गुप्तता बाळगण्यात येते. या चित्रपटाचीही गुप्तता बाळगण्यात आली होती. परंतु, क्रिकेटचे फॅन असलेल्यांनी मकबरा, ताज व अन्य स्थळीही गर्दी केली होती. या शूटिंगदरम्यान काहीजणांनी तर खुद्द महेंद्रसिंग धोनीच शहरात आल्याची अफवा पसरविली होती. सतत तीन दिवस चाललेल्या शूटिंगमुळे शहरवासीयांनी एक वेगळाच माहोल अनुभवला. शूटिंगबाबत चमूकडून मोठी गुप्तता बाळगण्यात आली. परंतु, माध्यमात वृत्त झळकल्याने अनेकांनी शूटिंगस्थळी गर्दी केली होती. या गर्दीचा ससेमिरा चुकविण्यासाठी मंगळवारी सर्व चमू पहाटे चार वाजता विद्यापीठ परिसरात दाखल झाली. तरीही अनेकांना त्याची कुणकुण लागल्याने, मॉर्निंग वॉक ला गेलेल्यांनी या शूटिंग बघण्याचा आनंद लुटला.
ताज समोरील न्यू आदर्श हॉटेलमध्ये साक्षी शिक्षण घेत असतांना थांबत होते. त्यामुळे याठिकाणी नाश्ता व चहा घेत असतानाचे काही दृश्ये शूट करण्यात आले. याठिकाणी स्पेशल व्हेज सॅन्डवीच, स्पेशल बटर बन, चहा यासोबत अन्य नाश्ताच्या पदार्थांची ऑर्डर देण्यात आली होती. नाश्ता करीत असलेल्या वेगवेगळ्या दृश्यांची यावेळी शूटिंग करण्यात आली. यानंतरची शूटिंग दुबई येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती चित्रपटाच्या चमूने दिली.