​आश्चर्य! राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा पहिल्यांदाच दिसले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 10:39 IST2016-12-14T10:39:28+5:302016-12-14T10:39:28+5:30

यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा शो बिझनेसमधील एक अपवादात्मक व्यक्ती आहे. बी-टाऊनमध्ये जेथे सर्वच जण प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी धडपड ...

Surprise! Rani Mukherjee and Aditya Chopra for the first time seen together | ​आश्चर्य! राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा पहिल्यांदाच दिसले एकत्र

​आश्चर्य! राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा पहिल्यांदाच दिसले एकत्र

राज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा शो बिझनेसमधील एक अपवादात्मक व्यक्ती आहे. बी-टाऊनमध्ये जेथे सर्वच जण प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी धडपड करत असतात तेथे अगदी सुरुवातीपासून आदित्य मीडियापासून दोन हात लांब राहिलेला आहे. परंतु लग्न झाल्यावर माणूस बदलतो असे म्हणतात ना, तसेच काहीसे होताना दिसतेय.

दोन वर्षांपूर्वी आदित्य चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जीने ग्रीसला गुपचूप लग्न केल्यानंतर प्रथमच हे जोडपे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. त्यांच्या जवळच्या मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी ते आले होते. पार्टीनंतर ते रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसताच छायाचित्रकारांना तर विश्वासच बसला नाही.

आजचा दिवस सफल म्हणत त्यांनी राणी-आदित्यचे फोटो क्लिक केले गेले. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये राणी आणि संपूर्ण काळ्या कपड्यांतील आदित्य फोटो काढले जाताहेत म्हणून खूश दिसत नव्हते. त्यामुळे आदित्य पटकन गाडीत बसला.






कपल : रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा

स्वत:च्या प्रायव्हसीसाठी अत्यंत आग्रही असणारा आदित्य मीडियाशी कधीच संवाद साधत नाही. एवढेच काय तो चित्रपट प्रोमोशनसाठीसुद्धा हजर राहत नाही. पण आता लग्न झाल्यापासून तो थोडासा फ्री झाला असे वाटतेय. 

कारण स्वत:च्या चित्रपटाच्या मेकिंगमध्येदेखील न दिसणाºया आदित्यचे ‘बेफिक्रे’च्या सेटवरील फोटो शेअर केले जात आहेत. यामध्ये तो रणवीर सिंग आणि वाणी कपूरला शॉट समजावून सांगताना दिसतो. म्हणजे राणीमुळे तो आता थोडा थोडा ओपन होत आहे तर.

गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी राणीने आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी तिने एक इमोशनल पत्रदेखील पोस्ट केले होते.

मागच्या आठवड्यात ‘अदिरा’चा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पार्टीला शाहरुख खान, दीपिका पदुकोन, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, यामी गौतम असे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

Web Title: Surprise! Rani Mukherjee and Aditya Chopra for the first time seen together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.