​‘कमांडो २’मध्ये दिसणार काळ्या पैशांवरील सर्जिकल स्टाईक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 18:51 IST2016-11-10T18:50:36+5:302016-11-10T18:51:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० व १००० रुपयांचे चलन (नोटा) तत्काळ बंद करीत असल्याचे सांगितले. याच पार्श्वभूमीवर आधारित ...

Surgical styling on black money in 'Commando 2' | ​‘कमांडो २’मध्ये दिसणार काळ्या पैशांवरील सर्जिकल स्टाईक!

​‘कमांडो २’मध्ये दिसणार काळ्या पैशांवरील सर्जिकल स्टाईक!

ong>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० व १००० रुपयांचे चलन (नोटा) तत्काळ बंद करीत असल्याचे सांगितले. याच पार्श्वभूमीवर आधारित एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. निर्माता विपुल शहा व दिग्दर्शक देवेन भोजानी यांच्या ‘कमांडो २’ या चित्रपटात एक राजकारणी काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी क ठोर पावले उचलित असल्याचे दाखविण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या  कमांडोचे साधर्म्य सध्याच्या परिस्थितीशी जुळत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


दिग्दर्शक देवेन भोजानी यांच्या आगामी कमांडो २ या चित्रपटात अभिनेता विद्युत जमावल काळ्या धनाचा पाठलाग करताना दिसणार आहे. देवेन म्हणाला, ‘कमांडो’ चित्रपटाची कथा सोपी होती. लोकांना हा चित्रपट आवडला होता. आम्ही या चित्रपटाच्या सिक्वलचा विचार करीत असतानाच याची कथा रहस्यपटासारखी असावी असा विचार मांडला. यामुळे हा विषय काळ्या पैशाचा शोध घेणारा असावा असे ठरले. याविषयावर चित्रपट तयार करण्यात आलेला नाही. यामुळे कथा लेखनासाठी आम्ही रितेश शहा यांच्याशी चर्चा केली.

निर्माता विपुल शहा यांनी होकार दिल्याने काम आणखीच सोपे झाले. मात्र त्यावेळी ‘कमांडो २’ आताच्या परिस्थितीशी साधर्म्य साधणारा असेल असे कुणालाच वाटले नव्हते. आम्ही एक चित्रपट निर्माण करू इच्छित होतो. आता, पंतप्रधानांचा निर्णय आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी आला असल्याने ही आमच्यासाठी आनंदाची बातमीच आहे असे देवेन म्हणाला. विपुल शहा निर्मित ‘फोर्स २’ या चित्रपटानंतर ६ जानेवारीला ‘कमांडो २’ प्रदर्शित केला जाणार आहे. 



कमांडो २ चित्रपटाबद्दल विपुल शहा म्हणाले, आमच्या चित्रपटात एक राजकारणी आहे. तो काळ्या पैशावर नियंत्रण यावे यासाठी प्रयत्न करणार आहे. दिग्दर्शक देवेन भोजानी याने देखील यावर होकारार्थी उत्तर दिले आहे. या चित्रपटात नुकत्याच घडलेल्या घटनांचा समावेश करणार का? यावर दोघांनी नकार दिला. आता शूटिंग पूर्ण झाली आहे. विद्युत दुसºया प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. यामुळे असे करणे शक्य नाही. पण ‘कमांडो २’ मधील राजकारणी काळ्या पैशांचा वापर करणाºयांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश ‘कमांडो’ला देणार आहे. 

Web Title: Surgical styling on black money in 'Commando 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.