Surekha Sikri birthday Special : सुरेखा सिक्री आणि नसिरुद्दीन शहा यांच्यात आहे अगदी जवळचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 03:15 PM2021-04-19T15:15:04+5:302021-04-19T15:18:19+5:30

प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह आणि सुरेखा सिक्री यांच्यात अगदी जवळचे नाते असल्याचे तुम्हाला माहीत आहे का?

Surekha Sikri birthday Special : Surekha Sikri is sister of naseeruddin shah first wife Parveen Murad | Surekha Sikri birthday Special : सुरेखा सिक्री आणि नसिरुद्दीन शहा यांच्यात आहे अगदी जवळचे नाते

Surekha Sikri birthday Special : सुरेखा सिक्री आणि नसिरुद्दीन शहा यांच्यात आहे अगदी जवळचे नाते

googlenewsNext
ठळक मुद्देवयाच्या अवघ्या 20व्या वर्षी नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या वयापेक्षा 15वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सिक्रीसोबत लग्न केले होते.

बालिकावधू या मालिकेत सुरेखा सिक्री यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती तर बधाई हो या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांनी अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. 

प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह आणि सुरेखा सिक्री यांच्यात अगदी जवळचे नाते असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? सुरेखा यांच्या बहिणीसोबत नसिरुद्दीन यांनी पहिले लग्न केले होते.  

वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या वयापेक्षा 15वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सिक्रीसोबत लग्न केले होते. त्यांच्या पत्नी मनारा यांना परवीना मुराद या नावानेही ओळखले जाते. नसीर यांनी मनारासोबत लग्न करण्याची इच्छा घरातल्यांना सांगितली होती. त्यावेळी त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.

घरातल्यांचा विरोध असतानाही नसीर यांनी मनारासोबत लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच मनारा यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव नसीर यांनी हीबा शाह असे ठेवले. त्यानंतर वर्षभरातच नसीर आणि मनारा यांच्यात खटके उडायला लागले. 1982 मध्ये नसीर आणि मनारा यांच्यात घटस्फोट झाला. मनारा आणि सुरेखा या बहिणी आहेत. 

Web Title: Surekha Sikri birthday Special : Surekha Sikri is sister of naseeruddin shah first wife Parveen Murad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.