सुपरस्टार रजनीकांत येत्या ३१ डिसेंबरला करणार राजकीय प्रवासाची घोषणा, वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 14:17 IST2017-12-26T08:47:34+5:302017-12-26T14:17:34+5:30

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी गेल्या मंगळवारी त्यांच्या प्रशंसकांना सांगितले की, येत्या ३१ डिसेंबर रोजी ते आपल्या राजकीय प्रवासाची घोषणा ...

Superstar Rajinikant will announce the political journey on December 31, read detailed! | सुपरस्टार रजनीकांत येत्या ३१ डिसेंबरला करणार राजकीय प्रवासाची घोषणा, वाचा सविस्तर !

सुपरस्टार रजनीकांत येत्या ३१ डिसेंबरला करणार राजकीय प्रवासाची घोषणा, वाचा सविस्तर !

मिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी गेल्या मंगळवारी त्यांच्या प्रशंसकांना सांगितले की, येत्या ३१ डिसेंबर रोजी ते आपल्या राजकीय प्रवासाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी रजनीकांत यांनी हेदेखील स्पष्ट केले की, ३१ डिसेंबरपासूनच राजकीय प्रवासाला सुरुवात असे नसून, राजकारणात केव्हा वाटचाल करायची याविषयी घोषणा करणार आहे. रजनीकांत यांनी म्हटले की, मी राजकारणात नवा नाही. मात्र याकरिता चिंतन आणि डावपेच आखणे महत्त्वाचे आहे. कारण निवडणुका युद्धासमान असतात. त्यातच एका व्यक्तीला युद्ध जिंकणे आवश्यक असल्याने त्यासाठी केवळ धाडस पुरेसे नसते.  

यावेळी रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावर पसरविल्या जात असलेल्या नकारात्मक अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच सकारात्मक बाबींवरच लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. दरम्यान, याअगोदर रजनीकांत यांनी नोव्हेंबर महिन्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, मला राजकारणात येण्याची काहीही घाई नाही, तर याच वर्षाच्या मे महिन्यात एका जाहीर सभेत बोलताना म्हटले होते की, जर परमेश्वराची इच्छा असेल तर मी राजकारणाचा मार्ग स्वीकारेल. रजनीकांत यांनी म्हटले होते की, ‘परमेश्वरच ठरवित असतो की, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात आपण काय करायला हवे. सद्यस्थितीत परमेश्वराला मला एक अभिनेता म्हणून बघायचे आहे. त्यामुळे मी याच क्षेत्रात माझे कर्तव्य पार पाडत आहे. जर परमेश्वराची इच्छा असेल तर भविष्यात मी नक्कीच राजकारणात प्रवेश करणार. 



पुढे बोलताना रजनीकांत म्हणाले होते की, जर मी राजकारणात आलो तर खूपच प्रामाणिकपणे कार्य करणार. जी मंडळी या क्षेत्रात गैरमार्गाने पैसा कमावतात, लोकांना लुटतात त्यांना अजिबातच सहन करणार नाही. अशा लोकांबरोबर काम न करता त्यांना योग्य तो धडा शिकविणार असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले होते. साउथमध्ये रजनीकांतबरोबर अभिनेता कमल हासन यांच्याही राजकीय प्रवासावरून मधल्या काळात चर्चा रंगली होती. कमल हासन यांनी राजकीय पटलावर पाऊल ठेवले असले तरी, रजनीकांत यांच्या प्रवेशाची मात्र प्रतीक्षा कायम आहे. अशात ३१ डिसेंबरला ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

Web Title: Superstar Rajinikant will announce the political journey on December 31, read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.