छोट्या पडद्यावर 'महानायक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST2016-01-16T01:20:48+5:302016-01-24T16:34:43+5:30

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर नव्या अवतारात दिसणार आहेत. ते आगामी टीव्ही शो 'आज की रात है जिंदगी' ...

The 'superhero' on the small screen | छोट्या पडद्यावर 'महानायक'

छोट्या पडद्यावर 'महानायक'

लीवूडचे महानायक अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर नव्या अवतारात दिसणार आहेत. ते आगामी टीव्ही शो 'आज की रात है जिंदगी' मध्ये दिसणार आहेत. आत्तापर्यंत कोणी त्यांना असे पाहिले नसेल अशा अवतारात ते दिसतील. रिअँलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' ला घराघरात पोहचवलेले अमिताभ बच्चन म्हणाले,' स्टार इंडिया सोबत टेलिव्हिजनवर आपला प्रवास सुरू केल्यानंतर स्टार प्लससोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्सुक आहे. खरंतर मला असे वाटते की, आपण सर्वांनी शो साठी एकत्र यावे आणि आपली परंपरा पुढे चालू ठेवूया.' बच्चन म्हणाले,' मी जेव्हा आज की रात है जिंदगी बद्दल ऐकले तेव्हा त्याच्यासोबत जोडले जाण्याविषयी मी विचार केला. माध्यमे हे असे माध्यम आहे की जे परिवर्तनसाठी प्रोत्साहन देते. परंतु, आपल्याला हे मनोरंजनच्या माध्यमातून मिळवता येणे शक्य आहे. मला हा शो पसंत आहे कारण हा पूर्णपणे मनोरंजक आहे.

Web Title: The 'superhero' on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.