This is Super Exciting! ​‘साहो’साठी प्रभास शिकला ‘हे’ खास कौशल्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 11:05 IST2017-08-29T06:24:08+5:302017-08-30T11:05:25+5:30

‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासला पाहायला सगळेच उत्सूक आहेत. त्यामुळे ‘साहो’ या प्रभासच्या आगामी सिनेमाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. याशिवाय या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीयं, यामागे आणखी एक कारण आहे. हे कारण म्हणजे, ‘साहो’मधील जबरदस्त अ‍ॅक्शन दृश्ये.

This is Super Exciting! 'Oh' special skill for 'Saho'! | This is Super Exciting! ​‘साहो’साठी प्रभास शिकला ‘हे’ खास कौशल्य!

This is Super Exciting! ​‘साहो’साठी प्रभास शिकला ‘हे’ खास कौशल्य!

ाहुबली’नंतर अभिनेता प्रभासला पाहायला सगळेच उत्सूक आहेत. त्यामुळे ‘साहो’ या प्रभासच्या आगामी सिनेमाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. याशिवाय या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीयं, यामागे आणखी एक कारण आहे.  हे कारण म्हणजे, ‘साहो’मधील जबरदस्त अ‍ॅक्शन दृश्ये. होय, प्रभासच्या या चित्रपटात हॉलिवूडच्या तोडीचे अ‍ॅक्शनदृश्ये दिसणार आहेत. यासाठीच हॉलिवूडचे टेक्निशिअन्स आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफरची एक अख्खी टीम सध्या खपते आहे. या चित्रपटात एक अंडरवॉटर सीनही दिसणार आहे. ‘साहो’चे दिग्दर्शक सुजीत सिंह यांनी अलीकडे मुंबईत या सीनचे टेस्ट शूट केले. तूर्तास या सीन्ससाठी परफेक्ट लोकेशनचा शोध सुरु असल्याचे कळतेय.
 



निश्चितपणे हा सीन चित्रपटाचा लीड हिरो प्रभासवर चित्रीत करण्यात येणार आहे. सध्या या सीन्ससाठी प्रभास तयारी करत असल्याचे कळतेय. होय, या एका सीनसाठी म्हणे, प्रभासने खास डिप सी ड्रायव्हिंग शिकलेय. ‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर प्रभास अमेरिकेत सुट्टीवर गेला होता, हे तुम्हाला आठवत असेलच. याठिकाणी प्रभासने स्कुबा ड्रायव्हिंगचे धडे घेतल्याचे कळतेयं. 
 


तसेही प्रभास एक समर्पित कलाकार आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो जीवापाड मेहनत घेतो. प्रत्येक सीन परफेक्ट असावा, हा त्याचा अट्टाहास असतो. त्यामुळे ‘साहो’मधील हा अंडरवॉटर सीनही एकदम परफेक्ट व्हावा, असे प्रभासचे मत होते आणि त्याचमुळे या एका सीनसाठी प्रभासने म्हणे स्कुबा ड्रायव्हिंग शिकले.   एकंदर काय तर प्रभास पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना इंम्प्रेस करणार, हे निश्चित. अलीकडे हैदराबादेत या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल शूट झालेत. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट श्रद्धा कपूर हिची वर्णी लागली आहे. पुढील महिन्यांत श्रद्धा ‘साहो’च्या टीमला जॉईन करेल, असे समजतेय.

ALSO READ : ​​प्रभासची हिरोईन बनण्यासाठी श्रद्धा कपूरला करावे लागणार ‘हे’ काम!

Web Title: This is Super Exciting! 'Oh' special skill for 'Saho'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.