सनी म्हणते, ‘ती’ डॉक्युमेंट्री भारतात रिलीज होऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 21:23 IST2016-09-20T15:53:27+5:302016-09-20T21:23:27+5:30
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी लिओनी हिच्या आयुष्यावर ‘मोस्टली सनी’ नावाची डॉक्युमेंट्री बनलीय. ही डॉक्युमेंट्री ...
.jpg)
सनी म्हणते, ‘ती’ डॉक्युमेंट्री भारतात रिलीज होऊ नये
प र्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी लिओनी हिच्या आयुष्यावर ‘मोस्टली सनी’ नावाची डॉक्युमेंट्री बनलीय. ही डॉक्युमेंट्री भारतात रिलीज होऊ नये, अशी सनीची इच्छा आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये मला न्याय दिला गेलेला नाही. माझ्या आयुष्यावर बनलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये कुण्या दुसºयाचेच विचार अधिक आहेत. ही माझी कथा नाही. ही डॉक्युमेंट्री म्हणजे कुण्या दुसºयाचे विचार, कुण्या दुसºयाचाच दृष्टिकोन आहे. त्यामुळेच ती भारतात रिलीज होऊ नये, एवढीच माझी अपेक्षा आहे, असे सनीने एका मुलाखतीत स्पष्ट केले. ‘मोस्टली सनी’मध्ये कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील सर्निया शहरात एका रूढीवादी शिख कुटुंबात जन्मलेली करनजीत कौर वोहरा अर्थात सनीचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. लहानपणापासून तर लॉस एंजिल्सपर्यंतचा तिचा प्रवास, सर्वात मोठी पॉर्न स्टार म्हणून तिची निर्माण झालेली ओळख असे सगळे काही यात आहे. दिलीप मेहता दिग्दर्शित या डॉक्युमेंट्रीचा अलीकडे टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमिअर शो झाला. मात्र कौटुंबिक सोहळ्यात व्यस्त असल्याचे कारण देत, सनीने या प्रीमिअरला उपस्थित राहणे टाळले होते.