सनी लिओनी भावाच्या लग्नात बनली ‘पंजाबी कुडी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 16:37 IST2016-12-13T16:35:33+5:302016-12-13T16:37:51+5:30
Sunny Leone dresses up as Punjabi kudi at brother’s wedding : Sunny Leone : अलीकडे सनी लिओनीच्या भावाचे म्हणजेच संदीप वोहरा याचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात सनीचा अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भावाच्या लग्नात सनी पारंपरिक पंजाबी पोशाखात दिसली.
.jpg)
सनी लिओनी भावाच्या लग्नात बनली ‘पंजाबी कुडी’!
प र्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा सनी लिओनी हिचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. पण सनीने अनेक प्रयत्नांनी या प्रवासातलं मुक्काम गाठत बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. अलीकडे सनीच्या भावाचे म्हणजेच संदीप वोहरा याचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात सनीचा अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भावाच्या लग्नात सनी पारंपरिक पंजाबी पोशाखात दिसली. संदीपने करिश्मा नायडू या साऊथ इंडियन मुलीशी विवाह केला. शिख आणि तामिळ अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सनी पती डेनिअल वेबरसोबत सहभागी झाली. निश्चितपणे ती या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण ठरली.
सनीने यावेळी निळ्या रंगाचा पंजाबी सूट परिधान केला होता. म्हणजेच भावाच्या लग्नात सनी अगदी परफेक्ट पंजाबी कुडी बनून आली होती. याऊलट तिचा पती डॅनिअलने पारंपरिक साऊथ इंडियन पोशाखात या सोहळ्यात सामील झाला. या लग्नाचे काही फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी सनीने स्वत: आपल्या भावाला तयार केले.
सनीचा भाऊ संदीप अमेरिकेत एक्झिक्युटीव्ह शेफ आहे. तर त्याची पत्नी करिश्मा कॅलिफोर्नियात राहणारी आहे. पेशाने ती एक फॅशन स्टायलिस्ट आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सनी बॉलिवूडमध्ये आहे. २०११ मध्ये ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये सनी दिसली होती. यानंतर ‘जिस्म2’,‘जॅकपॉट’ आणि ‘एक पहेली लीला’ या चित्रपटांमध्ये सनी दिसली. सध्या सनी शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सनी ‘लैला ओ लैला’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.