​सनी लिओनीची ‘ती’ जाहिरात पुन्हा वांद्यात! गोव्यात माजले रान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 13:17 IST2017-03-01T07:47:03+5:302017-03-01T13:17:03+5:30

गोव्यात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींवरून रान माजले आहे. येथील एका महिला संघटनेने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची कंडोमची वादग्रस्त ...

Sunny Leonei's 'advert' again! Rann in Goa! | ​सनी लिओनीची ‘ती’ जाहिरात पुन्हा वांद्यात! गोव्यात माजले रान!!

​सनी लिओनीची ‘ती’ जाहिरात पुन्हा वांद्यात! गोव्यात माजले रान!!

व्यात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींवरून रान माजले आहे. येथील एका महिला संघटनेने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची कंडोमची वादग्रस्त जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. केवळ सनीची जाहिरातच नाही तर अन्य महिला मॉडल्सच्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिराती तात्काळ हटवाव्यात, अशी मागणीही या संघटनेने पुढे रेटली आहे. हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिनीने या मुद्यावर गोवा राज्य महिला आयोगाला एक निवेदन दिले आहे. आयोगाने या निवेदनावर संबंधित जाहिरात कंपन्यांना नोटीस जारी केले आहे.
 कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींमध्ये महिलांना वस्तू म्हणून प्रदर्शित केले जाते. सार्वजनिक स्थळांवर प्रदर्शित या जाहिरातींमुळे महिलांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे रणरागिनी या संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच आधारावर या जाहिराती हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत असल्याचा दावाही या संघटनेने केला आहे. गर्भनिरोधक साधनांच्या जाहिरातीत महिलांच्या छायाचित्रांचा वापर केला जातो. बसगाड्या आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी या जाहिरातींमध्ये महिलांचे फोटो वापरले जातात, असेही या संघटनेने म्हटले आहे.



सनी लिओनीची संबंधित कंडोम जाहिरात हटवण्यात यावी, अशी मागणी याआधीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीपीआय नेते अतुल कुमार अंजान यांनी सनीच्या कंडोम जाहिरातीवर आक्षेपार्ह विधान केले होते. अर्थात त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी याबद्दल जाहिर माफी मागितली होती. सनीच्या कंडोम जाहिरातीमुळे अश्लिलता वाढत आहे.  सनीची अ‍ॅडल्ट मुव्ही बघून मी ओकारी केली होती, असे विधान त्यांनी केले होते. अंजान यांनी सनीला बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या भूमिकांचीही निंदा केली होती.

Web Title: Sunny Leonei's 'advert' again! Rann in Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.