सनी लिओनीने पतीसोबत लिपलॉक करतानाचा फोटो केला शेअर; सोशल मीडियावर उडाली खळबळ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 21:58 IST2017-06-17T16:28:15+5:302017-06-17T21:58:15+5:30

बॉलिवूडची बेबी डॉल आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच तिचे तडका लावणारे फोटोज् शेअर करीत असते. विशेष म्हणजे तिचे चाहतेही ...

Sunny Leone shared a photo of Leplock with her husband; Social media flare up !! | सनी लिओनीने पतीसोबत लिपलॉक करतानाचा फोटो केला शेअर; सोशल मीडियावर उडाली खळबळ!!

सनी लिओनीने पतीसोबत लिपलॉक करतानाचा फोटो केला शेअर; सोशल मीडियावर उडाली खळबळ!!

लिवूडची बेबी डॉल आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच तिचे तडका लावणारे फोटोज् शेअर करीत असते. विशेष म्हणजे तिचे चाहतेही सनीच्या प्रत्येक फोटोला पसंती देत असून, तिच्या सौंदर्यावर भावून जातात. यावेळेस सनीने असेच काही फोटो शेअर केले असून, त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोमध्ये सनी पती डेनियल वेबरबरोबर लिपलॉक करताना बघावयास मिळत आहे. 



सनीचा हा फोटो बघून एकच खळबळ उडाली असून, चाहते मात्र त्यास मोठ्या प्रमाणात लाइक्स करीत आहेत. मात्र काही चाहत्यांना सनीचा हा अंदाज फारसा भावला नसल्याने त्यांनी तिच्यावर टीका केली आहे. अर्थातच ही टीका तिच्या ‘पॉर्नस्टार’ या बिरुदावलीशी संबंधित आहे. परंतु सनीने अशा कॉमेण्ट्सला नेहमीच एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्याने तिच्याकडून अद्यापपर्यंत यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली गेली नाही. 



दरम्यान, फोटोमध्ये सनी आणि डेनियलच्या मागे एक व्यक्ती दिसत आहे. हा व्यक्ती दोघांचा लिपलॉक प्रताप बघत असावा असेच दिसत आहे. विशेष म्हणजे यूजर्सनी या व्यक्तीलाच टार्गेट केले असून, त्याच्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र हा व्यक्ती कोण? याचा अद्यापपर्यंत उलगडा झाला नसल्याने प्रत्येकालाच त्याच्याविषयी जाणून घेण्याची जणू काही आतुरता निर्माण झाली आहे. 



वास्तविक सनी नेहमीच पती डेनियल वेबर याच्याबरोबरचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत असते. तिच्या चाहत्यांना ही जोडी भावत असल्याने त्यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात लाइक्सही दिल्या जातात. परंतु यावेळचा दोघांचा फोटो काहींना फारसा भावला नसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. 



सनीच्या बॉलिवूड करिअरविषयी सांगायचे झाल्यास, ती अखेरीस शाहरूख खान याच्या ‘रईस’मध्ये आयटम सॉँग करताना बघावयास मिळाली होती. त्यावेळी तिच्या ‘लैला मैं लैला’ या आयटमनंबरने सर्वत्र धूम उडवून दिली होती. आजही हे आयटम नंबर तिच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. 

Web Title: Sunny Leone shared a photo of Leplock with her husband; Social media flare up !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.