सनी लिओनीने कोरोना पासून बचाव करण्यासाठी लढवली शक्कल, मेकअप खराब न करता लावला असा मास्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 19:20 IST2020-11-11T19:20:00+5:302020-11-11T19:20:01+5:30
अलीकडेच सनी मुंबईत परतली आहे.

सनी लिओनीने कोरोना पासून बचाव करण्यासाठी लढवली शक्कल, मेकअप खराब न करता लावला असा मास्क
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने कोरोना व्हायरस दरम्यान शूटिंग करताना मेकअप सुरक्षित ठेवण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केले आहे, ज्यात सनी लिओनी ट्रान्सपरंट मास्क घातलेला दिसतो आहे. ट्रान्सपरंट मास्कमुळे तिचे नाक, तोंड कव्हर केले गेले आहे विशेष म्हणजे हा मास्क लावल्यावर तिची लिपस्टिक खराब होत नाही. फोटो शेअर करताना सनीने लिहिले, "मेकअप खराब न करता शॉट्स दरम्यान सेफ."
सनी लिओनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत लॉस एंजेलिसमध्ये होती. अलीकडेच सनी मुंबईत परतली आहे. मुंबई परत येताच तिने शूटिंगला सुरुवात केली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी लिओनी लवकरच 'एमएक्स प्लेयर' वरील 'बुलेट्स'मध्ये करिश्मा तन्नासमवेत दिसणार आहे. सध्या सनी मुलांची विशेष काळजी घेते आहे. लॉकडाऊन दरम्यान सनी सोशल मीडियार खूपच सक्रिय होती. लॉस एंजेलिसमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात होती. जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.