सनी लिओनीने आपल्या चिमुकलीला कवेत लपवित केला कठुआ घटनेचा निषेध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 17:55 IST2018-04-14T12:25:03+5:302018-04-14T17:55:03+5:30

अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलगी निशाला आपल्या जॅकेटमध्ये लपविताना दिसत ...

Sunny Leone hid her little puppy in protest against the occurrence of a turtle! | सनी लिओनीने आपल्या चिमुकलीला कवेत लपवित केला कठुआ घटनेचा निषेध!

सनी लिओनीने आपल्या चिमुकलीला कवेत लपवित केला कठुआ घटनेचा निषेध!

िनेत्री सनी लिओनीने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलगी निशाला आपल्या जॅकेटमध्ये लपविताना दिसत आहे. सनीने फोटो शेअर करताना लिहिले की, ‘माझे वचन आहे तुला, माझे हृदय, माझी आत्मा, माझ्या शरीराचा प्रत्येक भाग तुला जगातील त्या राक्षसी प्रवृत्तीपासून वाचविणार. एवढेच काय तर तुझ्या संरक्षणासाठी मी माझा प्राण देण्यासही तयार आहे. राक्षसी वृत्तीच्या लोकांपासून सर्व लहान मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची गरज आहे. आपल्या मुलांना आपल्या जवळ ठेवा. प्रत्येक क्षणी त्यांचे संरक्षण करा.’



सनीने हे ट्विट कठुआ येथील आठ वर्षीय चिमुरडीसोबत झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. बॉलिवूडमध्येही सध्या याविषयी प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. सनीने याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, सनीने निशा आणि डेनियलने जुलै २०१७ मध्ये महाराष्टÑातील लातूर येथून दत्तक घेतले होते. यासाठी तिला तब्बल दोन वर्ष सर्व प्रक्रिया पार पाडावी लागली. 



निशा व्यतिरिक्त सनी आणि डॅनियलला दोन जुळी मुलेही आहेत. मार्च २०१८ मध्ये सनीने याबाबतची घोषणा केली होती की, डेनियल जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. ही गोड बातमी सांगताना सनीने लिहिले होते की, २१ जून २०१७ हा दिवस होता. जेव्हा डेनियल आणि मला कळाले की, आमची तीन मुले असतील. आम्ही प्लॅन केला आणि फॅमिली बनविण्याचा प्रयत्न केला. कित्येक वर्षांनंतर अशार सिंग वेबर, नूह सिंग वेबर आणि निशा कौर वेबर यांच्यासह आमची फॅमिली कम्प्लीट झाली आहे. आमच्या मुलांचा जन्म काही आठवड्यांपूर्वीच झाला. 

Web Title: Sunny Leone hid her little puppy in protest against the occurrence of a turtle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.