अ‍ॅक्टिंगला ब्रेक देत सनी लिओनीने घेतला शाळेत प्रवेश!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 22:34 IST2017-04-05T17:04:24+5:302017-04-05T22:34:24+5:30

आपले सर्व प्रोफेशनल प्रोजेक्ट्स पुर्ण करून सनी लिओनीने चित्रपटांमधून ब्रेक घेत थेट अमेरिका गाठली आहे. आता तुम्ही म्हणाल की, ...

Sunny Leone has given a break in acting | अ‍ॅक्टिंगला ब्रेक देत सनी लिओनीने घेतला शाळेत प्रवेश!!

अ‍ॅक्टिंगला ब्रेक देत सनी लिओनीने घेतला शाळेत प्रवेश!!

ले सर्व प्रोफेशनल प्रोजेक्ट्स पुर्ण करून सनी लिओनीने चित्रपटांमधून ब्रेक घेत थेट अमेरिका गाठली आहे. आता तुम्ही म्हणाल की, अमेरिकेत ती व्हेकेशन किंवा हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेली असेल. परंतु याठिकाणी ती चक्क शाळेत जाण्यासाठी आली आहे. आपल्यातील स्किल्स अधिक चांगले करण्यासाठी तिने लॉस एंजलिस येथील एका इन्स्ट्यिूटमध्ये अ‍ॅडमिशन घेतले आहे. सनीला स्क्रिप्ट रायटिंग आणि एडिटिंग शिकायचे असून, यासाठी तिला आता दररोज शाळेत जावे लागणार आहे. 



वास्तविक सनी सध्या चित्रपटांमधील टेक्निकल बाबी शिकण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे. जेव्हा सनीला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, मी या कोर्सविषयी बºयाच दिवसांपासून जाणून होते. शिवाय हा कोर्स पुर्ण करण्याची माझी इच्छा होती. मात्र वेळेचे नियोजन जुळून येत नसल्याने ही इच्छा अपूर्ण होती. सध्या माझ्याकडे काही प्रमाणात वेळ असून, यासर्व नव्या गोष्टी शिकण्यासाठी पुन्हा शाळेत जाण्यास मी खूप एक्सायटेड असल्याचे तिने सांगितले. 



काही दिवसांपूर्वीच सनी व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी मेक्सिको येथे पोहोचली होती. मेक्सिकोच्या बीचवरील काही बिकिनी फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर करीत सनीने धूम उडवून दिली होती. पतीसोबत मस्ती करतानाचे सनीचे फोटो तिच्या फॅन्सकडून खूपच लाइक केले जात होते. फोटोमध्ये सनी जबरदस्त बोल्ड आणि सेक्सी अंदाजात दिसत होती. 



त्यामुळे मेक्सिको येथून परतल्यानंतर ती थेट बॉलिवूडमधील आपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु सनी बॉलिवूडमध्ये न परतता तिथे थेट अमेरिका गाठत शिक्षणाची कास धरली आहे. आता सनी नियमितपणे शाळेत जाऊन शिक्षण पुर्ण करणार आहे. ती किती काळ अमेरिकेत असेल हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी, तिने लवकरच बॉलिवूडमध्ये परतावे अशी इच्छा तिच्या चाहत्यांची असेल. 

Web Title: Sunny Leone has given a break in acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.