सनी लिओनीने दिले ‘चॅलेंज’ ; जिंकणा-यास मिळणार स्मार्टफोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 16:07 IST2017-12-24T05:31:49+5:302017-12-24T16:07:57+5:30
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते असाल तर तिने दिलेले एक चॅलेंज स्वीकारण्याची संधी तुमच्याकडे आहे. होय, सनीने तिचे चाहते व सोशल मीडिया युजर्सला एक चॅलेंज दिले आहे.

सनी लिओनीने दिले ‘चॅलेंज’ ; जिंकणा-यास मिळणार स्मार्टफोन!
ब लिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते असाल तर तिने दिलेले एक चॅलेंज स्वीकारण्याची संधी तुमच्याकडे आहे. होय, सनीने तिचे चाहते व सोशल मीडिया युजर्सला एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज पूर्ण करणा-यास सनीसोबत व्हिडिओत झळकण्याची संधीचं नाही तर एक स्मार्टफोनही भेट म्हणून मिळणार आहे. सनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत सनी आपल्या चाहत्यांना एक चॅलेंज देत आहे. त्यानुसार, तुम्हाला फक्त तुमचे प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि मग हाईपस्टार अॅपच्या मदतीने बनवलेला हा व्हिडिओ टिष्ट्वटरवर #SunnyLeoneChallenge सोबत अपलोड करायचा आहे. यातील बेस्ट व्हिडिओ निवडून सनी विजेत्यांची नावे घोषित करणार. विजेत्यांना सनी व्हिडिओसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी मिळणार आहे. केवळ बोलण्याची संधीचं नाही तर विजेत्यांना एक स्मार्टफोनही गिफ्ट म्हणून मिळणार.
या चॅलेंज देणा-या व्हिडिओत सनी एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतेय आणि तिचे अनेक मित्र यादरम्यान तिला ज्वॉईन करताहेत. तूर्तास या व्हिडिओला १५ हजारांवर व्ह्युज मिळाले आहेत. twitterवरही सनीचे चॅलेंज नंबर एकवर ट्रेंड करत आहे. अलीकडे सनीचा ‘तेरा इंतजार ’ हा सिनेमा रिलीज झाला होता. अर्थात बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
ALSO READ :OMG! इमेज बदलण्याच्या प्रयत्नांत सनी लिओनी होणार ‘वाईल्ड’ !
सध्या सनी आपल्या इमेज मेकओव्हरमध्ये लागलीय. ‘पॉर्न स्टार’ ही इमेज सनीला पुसून काढायची आहे. बॉलिवूडमध्ये सनीला आत्तापर्यंत बोल्ड भूमिकाच मिळाल्या. त्यामुळे अलीकडे सनीने साऊथकडे मोर्चा वळवला आहे. साऊथमध्ये एक पीरियड ड्रामा फिल्म सनीने साईन केली आहे. यात सनी अॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यासही सनी उत्सुक आहे. माधुरी दीक्षित, कंगना राणौत, विद्या बालन अशा बड्या अभिनेत्रींनी या बायोपिकसाठी नकार दिला असतानाच सनीने मात्र यात इंटरेस्ट दाखवला आहे. अर्थात तूर्तास दिग्दर्शकांनी या बायोपिकसाठी सनीचे नाव फायनल केलेले नाही. या व अशा चित्रपटामुळे तरी आपली इमेज बदलेल, असा सनीचा कयास आहे. आता या प्रयत्नांत सनीला किती यश मिळते, ते बघूच.