कोरोना व्हायरसचा या अभिनेत्रीने घेतला धसका, चाहत्यांनाही स्वतःपासून ठेवते लांब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 13:04 IST2020-02-05T13:00:51+5:302020-02-05T13:04:34+5:30
कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने मास्क लावलेला फोटो शेअर करत कशा रितीने आपली सुरक्षा केली पाहिजे याविषयी सांगितले आहे.

कोरोना व्हायरसचा या अभिनेत्रीने घेतला धसका, चाहत्यांनाही स्वतःपासून ठेवते लांब
चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना वायरसचा प्रभाव आता हळूहळू जगभरात होताना दिसत आहे. प्रत्येक देश या वायरसपासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी विमानतळापासून रुग्णालयांपर्यंत आवश्यक गोष्टींची पूर्तता करताना दिसत आहे. कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायरसबाबत लोकांच्या मनात आता भिती निर्माण झाली आहे.
याच गोष्टीचा धसका बेबी डॉल सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअर वेबरनेही घेतल्याचे पाहायला मिळतंय. याचाच परिणाम म्हणून सध्या सनी जिथे जिथे फिरते तिथे तिथे ती अशाप्रकारचे चेह-याला मास्क लावून फिरत असल्याचे पाहायला मिळतंय. सध्या तिचा मास्क लावल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तसेच खुद्द सनीने डॅनिअलसह मास्क लावलेला फोटो शेअर करत कशा रितीने आपली सुरक्षा केली पाहिजे याविषयी सांगितले आहे. सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुमच्या आसपास काय चाललं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला वाटतं का की कोरोना वायरसचे शिकार तुम्ही होणार नाही. स्मार्ट व्हा आणि सुरक्षित रहा.
व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे नुकतेच एअरपोर्टवर सनीला पाहून तिचे काही फॅन्स तिच्या जवळ सेल्फीसाठी विचारणा करू लागले. नो सेल्फी प्लिज.... फॅन्सना तिने जवळ येण्यास रोखलेही पण त्यात सेल्फीसाठी एक फॅन्स तिच्या जवळ येताच तिने चेह-यावर मास्क लावले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सनी लिओनी गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळते आणि लोकांच्या संपर्क टाळ्यासाठी ती मास्क लावूनच फिरत याची खबरदारी घेते. इतकेच नाही तर ती ज्यांना ज्यांना भेटते त्यांना त्यांच्या सेफ्टीसाठी अशा प्रकारचे मास्क लावूनच फिरण्याचे आवाहनही करत आहे.