मुलासाठी सनी देओलने सोडला ‘बाहुबली’च्या लेखकाचा सिनेमा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 14:58 IST2017-05-05T09:28:41+5:302017-05-05T14:58:41+5:30
‘बाहुबली2’ने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बॉक्सआॅफिसवरच्या कमाईचे सगळे विक्रम तोडत ‘बाहुबली2’ सरस ठरला आहे. याघडीला ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस. ...
.jpg)
मुलासाठी सनी देओलने सोडला ‘बाहुबली’च्या लेखकाचा सिनेमा!
‘ ाहुबली2’ने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बॉक्सआॅफिसवरच्या कमाईचे सगळे विक्रम तोडत ‘बाहुबली2’ सरस ठरला आहे. याघडीला ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्यासोबत काम करण्यास प्रत्येकजण तयार आहे. असा कुठलाच भारतीय कलाकार नसेल, जो त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नाही. राजमौली यांच्याइतकेच त्यांच्या वडिलांसोबतही काम करण्यास प्रत्येकजण उत्सूक आहे आणि का नसावे? विजेन्द्र यांनी सलग तीन सुपरहिट चित्रपटांची पटकथा लिहिलीय. ‘बजरंगी भाईजान’,‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली२’ या तिन्ही चित्रपटांची पटकथा विजेन्द्र यांनी लिहिली आहे. त्यामुळेच सध्या फिल्म इंडस्ट्रीत विजेन्द्र यांनी जबरदस्त क्रेझ आहे. पण सनी देओलचे म्हणाल तर त्याची बातच काही वेगळी आहे. होय, सनीने के. व्ही. विजेन्द्र यांच्या ‘मेरा भारत महान’ या चित्रपटाला नकार दिला आहे.
![]()
सनी देओल विजेन्द्र यांच्या ‘मेरा भारत महान’मध्ये काम करणार, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा चित्रपट स्वत: राजमौली दिग्दर्शित करणार, असेही ऐकवात आले होते. अर्थात राजमौली ‘बाहुबली2’मध्ये बिझी असल्याने या चित्रपटाबद्दल ते मौन बाळगून असल्याचे म्हटले गेले होते. पण आता सनीने हा चित्रपट सोडल्याची बातमी आली आहे. याचे कारण म्हणजे, सनीचा मुलगा आणि राईझिंग स्टार करण सिंह. होय, सनी आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात करण दिसणार आहे. याच चित्रपटात सनी बिझी आहे. हा चित्रपट खुद्द सनी दिग्दर्शित करतोय. त्यामुळे विजेन्द्र यांचा चित्रपट त्याने नाकारला आहे. खुद्द विजेन्द्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सनी देओलसोबतच्या चित्रपटाचे काम सुरु झालेले नाही. कारण सध्या सनी त्याच्या मुलाच्या चित्रपटात व्यग्र आहे, असे विजेन्द्र यांनी सांगितले.