​अन् भाऊ बॉबीबद्दल बोलताना सनी देओल झाला भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 16:33 IST2017-09-10T09:48:38+5:302017-09-10T16:33:18+5:30

‘पोस्टर ब्वॉईज’ काल-परवाचा रिलीज झाला. या चित्रपटातील सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या कामाची बरीच प्रशंसा होतेय. ...

Sunny Deol became emotional about brother and Bobby! | ​अन् भाऊ बॉबीबद्दल बोलताना सनी देओल झाला भावूक!

​अन् भाऊ बॉबीबद्दल बोलताना सनी देओल झाला भावूक!

ोस्टर ब्वॉईज’ काल-परवाचा रिलीज झाला. या चित्रपटातील सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या कामाची बरीच प्रशंसा होतेय. ‘पोस्टर ब्वॉईज’मधून बॉबीने चार वर्षांनंतर कमबॅक केलेय. याआधी चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटला आणि त्यानंतर बॉबीही बॉलिवूडमधून दिसनेसा झाला. मध्यंतरी बॉबी दिल्लीच्या एका क्लबमध्ये डिजे म्हणून काम करतोय, अशी बातमी आली होती. या बातमीत किती तथ्य होते, हे आम्हाला ठाऊक नाही. पण या बातमीबद्दल सनी देओलला विचारले गेले तेव्हा तो भावूक झाला. भावाबद्दल बोलताना त्याचा गळा भरून आला.

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी एका रेडिओच्या स्टुडिओमध्ये आला होता. यावेळी आपल्या चित्रपटापासून तर आपल्या कुटुंबापर्यंत अशा अनेक गोष्टींवर तो बोलला. पण बॉबीच्या करिअरबद्दल प्रश्न करताच सनी कमालीची भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
बॉबी गेल्या दहा वर्षांपासून निर्मात्यांना काम मागत होता. मात्र कुठलाही निर्माता त्याला काम द्यायला तयार नव्हता. यामुळे बॉबी डिप्रेशनमध्ये गेला होता, असे सनीने सांगितले आणि हे सांगता सांगता त्याचे डोळे पाणावले. आम्ही सर्व सोबत आहोत. आमचे कुुटुंब खंबीर कुटुंब आहे. पण एकमेकांचे दु:ख आम्ही पाहू शकत नाही, असेही सनी म्हणाला. 

ALSO READ : ​ श्रीदेवी -ऐश्वर्या राय यांनी मला नकार दिला! जाणून घ्या, कुठल्या नकाराबद्दल बोलतोय सनी देओल!!

यापूर्वी बॉबीनेही काम मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली होती. मी धर्मेन्द्रचा मुलगा आहे. मला मोठे रोल हवेत, म्हणून मी आलेल्या आॅफर्स धुडकावतो. मी एका रईस बापाचा बिघडलेला मुलगा आहे. आळशी आहे, असे काही काही लोक बोलतात. पण असे काहीही नाही. मी कामासाठी तरसतो आहे. मला काम द्या, मी स्वत:ला सिद्ध करून दाखवेल. मला काम मागण्यात काहीही लाज वाटत नाही. मला काम का मिळत नाहीय? हा प्रश्न मीच स्वत:ला अनेकदा विचारतो, असे तो म्हणाला होता.

Web Title: Sunny Deol became emotional about brother and Bobby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.